esakal | "रेड झोन' आला आडवा...विवाहितेचा मुलासह आत्महत्येचा निर्णय..त्यावर वडिलांची युक्ती सफल!
sakal

बोलून बातमी शोधा

lady corona.jpg

माहेरवाशीण असलेल्या विवाहितेचा सासरी इचलकरंजीला महिन्यापासून शारीरिक व मानसिक छळ होत होता. तिने वारंवार फोन करूनही लॉकडाउनमुळे वडिलांना तिच्यापर्यंत पोचता येत नव्हते. "रेड झोन'मुळे प्रशासन परवानगी देत नव्हते. पण त्यानंतर जे काही घडले ते थक्क करणारे होते.

"रेड झोन' आला आडवा...विवाहितेचा मुलासह आत्महत्येचा निर्णय..त्यावर वडिलांची युक्ती सफल!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : येथील कॅम्प भागातील माहेरवाशीण असलेल्या विवाहितेचा सासरी इचलकरंजीला महिन्यापासून शारीरिक व मानसिक छळ होत होता. तिने वारंवार फोन करूनही लॉकडाउनमुळे वडिलांना तिच्यापर्यंत पोचता येत नव्हते. "रेड झोन'मुळे प्रशासन परवानगी देत नव्हते. पण त्यानंतर जे काही घडले ते थक्क करणारे होते.

असा घडला प्रकार

विवाहितेचा सासरी इचलकरंजीला महिन्यापासून शारीरिक व मानसिक छळ होत होता. तिने वारंवार फोन करूनही लॉकडाउनमुळे वडिलांना तिच्यापर्यंत पोचता येत नव्हते. छळाची परिसीमा गाठल्याने दीड वर्षाच्या मुलासह आत्महत्या करण्याचा शेवटचा सांगावा मुलीने फोनद्वारे हतबल पिता राजेंद्र हिरे यांना सांगितला. त्यांनी बंडूकाकांकडे मदतीची याचना केली. प्रशासन परवानगी देत नसले तरी एक मुलगी व दीड वर्षाच्या बाळाचा जीव वाचविण्यासाठी बंडूकाकांनी जवळपास हजार किलोमीटर स्वतःची गाडी नेऊन विवाहितेला मालेगावला आणले. बाळासह अपेक्षा सुखरूप घरी परतल्याने कुटुंबीय व नातेवाइकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

हेही वाचा > धक्कादायक! ''हे' रुग्णालय फक्त कोरोना रुग्णांसाठीच'...म्हणून रुग्णाला पाठविले माघारी...

अन् बंडूकाका धावले..!

सतत होणाऱ्या छळामुळे बाळासह आत्महत्येचा पर्याय मुलीने वडिलांना सांगितल्यानंतर हिरे यांनी शेवटचा पर्याय म्हणून बंडूकाकांकडे मदत मागितली. बंडूकाकांनीही अधिकाऱ्यांना गळ घातली. मात्र मालेगावचा "रेड झोन' आडवा आला. अखेर काकांनी स्वतःची गाडी, चालक व राजेंद्र हिरे यांना घेत मुलीला बाळासह मालेगावला आणले. आल्यानंतर तिच्या आईने गल्लीतच हंबरडा फोडला. जाचातून सोडवल्याने हिरे कुटुंबीयांसह अनेकांनी बंडूकाकांचे आभार मानले.  

हेही वाचा > CM आदित्यनाथ यांना धमकाविणाऱ्या आणखी एकाला नाशिकमधून अटक...एटीएसची मोठी कारवाई

go to top