"पोलीसकाका..तुम्हीही काळजी घ्या!" चिमुकलीच्या मदतीने पोलीसही भारावले!

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 30 March 2020

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन दरम्यान बाहेर फिरू नका, असे सातत्याने आवाहन करूनही काही उडानटप्पू विनाकारण दुचाकीवर फिरण्याचे प्रकार वाढल्याने आता प्रशासन व शहर पोलीस ऍक्‍शन मोडमध्ये आले आहेत. मारहाणीपेक्षा शहरातील सर्व प्रमुख अंतर्गत मार्ग बंद करण्याचा नवा पर्याय अवलंबला आहे. पोलिसांनी विंचूर चौफुलीसह शहरात नागरिकांना घरात बसण्याची सवय लावली असली तरी शनिवारी मात्र अनेक जण दुचाकी घेऊन गावात विनाकारण फिरत असल्याचा प्रकार सुरू होता.

नाशिक / येवला : सामाजिक बांधिलकीत अग्रेसर असलेल्या येवला शहरातील चिमुकल्या मुलींनी मास्क शिवत त्याचे पोलिसांना वाटप केले. चिमुकली मुलीच्या या मदतीने पोलिस भारावले. शहरातील गायत्री वखारे या मुलीने आपल्या रक्षणासाठी सतत कार्यरत असलेल्या पोलिसांसाठी कुटुंबाच्या समवेत मास्क शिवत त्याचे पोलिसांना वाटप करण्याचा निश्‍चय केला. दोन दिवसांतच तीने हे मास्क तयार करून पोलिसांना वाटप केले. 

भटकणाऱ्या उडाणटप्पूंसाठी चौकाचौकांत बॅरिकेड्‌स 
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन दरम्यान बाहेर फिरू नका, असे सातत्याने आवाहन करूनही काही उडानटप्पू विनाकारण दुचाकीवर फिरण्याचे प्रकार वाढल्याने आता प्रशासन व शहर पोलीस ऍक्‍शन मोडमध्ये आले आहेत. मारहाणीपेक्षा शहरातील सर्व प्रमुख अंतर्गत मार्ग बंद करण्याचा नवा पर्याय अवलंबला आहे. पोलिसांनी विंचूर चौफुलीसह शहरात नागरिकांना घरात बसण्याची सवय लावली असली तरी शनिवारी मात्र अनेक जण दुचाकी घेऊन गावात विनाकारण फिरत असल्याचा प्रकार सुरू होता.

हेही वाचा > #Lockdown : 'ताई, खूप दिवसांनी घरचं जेवण मिळालं!'...अन् 'त्या' पोलिसांचे डोळे पाणावले​

यातील अनेक नागरिक किरकोळ कारणासाठी, तर निम्म्याहून अधिक कामाशिवाय रस्त्यावर दुचाकी घेऊन नाहक गर्दी करीत होते. किराणा दुकान, पेट्रोलपंप, भाजी, फळे, दूध घेण्याच्या निमित्ताने फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याने अनेकांचे आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसह ग्रामीण भागास जोडणारे अनेक रस्ते बंद करून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. 

हेही वाचा > रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या 'त्या' अनोळखी तरुणाच्या मदतीला देवदूतासारखा धावून आला!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A mask made by little girl for police due to lockdown Nashik Marathi News