धक्कादायक! मोदींचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल...अन् ओझरहून 'त्या' विमानाचे टेकऑफच नाही?

modi ji.png
modi ji.png

नाशिक : (ओझर) उडीसा येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उडीसाचे मुख्यमंत्री नामदार पटनाईक यांच्या विनंतीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रातोरात वायुदलाच्या विशेष विमानाने कोरोना किट भुवनेश्वर येथे पाठवल्याचा एक संदेश सध्या सोशल मिडीयावर फिरत होता. याची खातरजमा केली असता असे कोणत्याही विमानाने ओझर येथुन टेकऑफ केलाच नसल्याची धक्कादायक माहीतीसमोर आली. विमानतळावरील अधिका-यांनी देखील असा कोणत्याच विमानाने टेक ऑफ केले नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

असा आहे प्रकार

या बाबतची माहिती अशी की, उडीसा येथील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उडीसाचे मुख्यमंत्री नामदार पटनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रात्री बारा वाजेच्या सुमारास फोन करून कोरोना किट भुवनेश्वर येथे पाठवण्याची विनंती केली. मोदींनी सदरचे किट सूर्योदयापुर्वी भुवनेश्वरला मिळतील असा एक मेसेज सोशल मिडीयात फिरत होता. याच मेसेजमध्ये पंतप्रधान व उडीसाचे मुख्यमंत्री पटनाईक यांच्यात झालेल्या संवादात पुढील सहा तास सदरचे किट हे भुवनेश्वर येथे पाठवले जातील असे आश्वासन मोदींनी दिले. नंतर मध्यरात्री पासुनच पंतप्रधान कार्यालयाने तातडीचे पाऊले उचलत मुंबईत कोरोनाचे किट घेऊन अडकलेले काही ट्रक तातडीने नाशिकला रवाना करून ओझर येथील विमानतळावर पाठवले. ओझर येथुन वायुदलाच्या विशेष विमानाने ते भुवनेश्वर येथे पाठवल्याची या मेसेजमध्ये नमुद केले गेले आहे. याबाबत खातरजमा केली असता ओझर येथील वायुदलाचे अथवा इतर कोणत्याही विमानाने टेकऑफच घेतला नसल्याची माहीतीसमोर आली. सोशल मिडीयात फिरणारा हा मेसेज चक्क फेक असल्याचे आता समोर आले आहे.

ते विमान चार एप्रिल रोजीच उडाले

या न उडालेल्या विमानाबाबतची माहीती घेत असतांना मात्र भुवनेश्वरसाठी कोरोनाचे किट घेऊन जाणारे अलांयन्स कंपनीचे विमान चार एप्रिल रोजीच गेल्याची माहीती हाती आली. याच विमानात सॅनेटाईझर, मास आदी मेडिकल किट दैंनदिन प्रवासी विमानाने गेल्याची माहीती विमानतळावरील अधिका-यांनी दिली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com