ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या 'त्या' फोटोमागचे सत्य समजले.. तर तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 13 May 2020

खिशात दमडी नाही, भार होऊ नये म्हणून खांद्याला टांगलेल्या कापडी पिशवीत दोन- चार चपात्या, कांदा अन्‌ तहान भागविण्यासाठी प्लॅस्टिकची पाण्याची बाटली. शंभर- सव्वाशे नव्हे, तर अनेक नागरिक रोज नाशिकहून पायपीट करत आपले गाव गाठताय. केंद्राकडून या महिन्यापासून विशेष रेल्वेसेवाही सुरु करण्यात आली आहे. त्याबद्दल विचारलं असता मजुरांनी सांगितलं की, आम्हाला अशी कोणती माहिती मिळाली नाही. ज्यामुळे.. 

नाशिक : शेकडो किलोमीटरच्या पायपीटीने सुजलेले, रक्ताळलेले पाय...  निरागस चेहऱ्याचं पोरं खांद्यावर घेऊन कधी गाव गाठतो, याची लागलेली आस... उद्याचे भवितव्य उराशी बाळगून भीतीने ग्रासलेले चेहरे..लॉकडाऊनच्या काळात हृदय पिळवटून टाकणाऱ्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आताही सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलं असललेल्या ट्रकमध्ये चढतात. यावेळी एक व्यक्ती चिमुकल्याला एका हाताने उचलतो आणि आईकडे देतो. छत्तीसगढमधील या फोटोमुळे लोक घरी जात असताना किती त्रास सहन करतात. वेळ प्रसंगी त्यांनी कशी कसरत करावी लागते हे दिसत आहे.

तर अशी आहे गोष्ट

फोटोमध्ये लहान मुलांसह ट्रकमध्ये व्यक्ती चढताना दिसते. यात लहान मुलाला व्यक्तीनं एका हातानं पकडलं आहे  तर दुसऱ्या हाताने ट्रकला असलेली दोरी धरली आहे. त्यानंतर ती व्यक्ती मुलाला ट्रकमध्ये असलेल्या व्यक्तीकडे सोपवते. छत्तीसगढमधला हा व्हिडिओ असून यात एक महिलाही ट्रकमध्ये चढण्यासाठी धडपड करताना दिसते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना काही मजुरांनी सांगितलं की, 'तेलंगणातून प्रवास सुरू केला होता. घरी पोहोचण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नव्हता. हाताला काम नाही आणि खायला पैसे नाहीत अशा परिस्थितीत आम्ही काय केलं असतं? ..आम्हाला घरी जायचं आहे.'

हेही वाचा > PHOTOS : थरारक! परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारे तीन ट्रक अन् एक कारचा भीषण अपघात..

मजूर म्हणतात.. आम्हाला अशी कोणती माहिती मिळाली नाही
खिशात दमडी नाही, भार होऊ नये म्हणून खांद्याला टांगलेल्या कापडी पिशवीत दोन- चार चपात्या, कांदा अन्‌ तहान भागविण्यासाठी प्लॅस्टिकची पाण्याची बाटली. शंभर- सव्वाशे नव्हे, तर अनेक नागरिक रोज नाशिकहून पायपीट करत आपले गाव गाठताय. केंद्राकडून या महिन्यापासून विशेष रेल्वेसेवाही सुरु करण्यात आली आहे. त्याबद्दल विचारलं असता मजुरांनी सांगितलं की, आम्हाला अशी कोणती माहिती मिळाली नाही. ज्यामुळे प्रवासासाठी मदत होऊ शकेल. दरम्यान राज्य परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रवासाचं इतर कोणतंही साधन नाही. प्रशासन त्यांना खास बसची सुविधा द्यायला तयार आहे. पण मी परिवहन विभागातून आहे आणि माझ्या पातळीवर कोणतीच व्यवस्था करू शकत नाही.

हेही वाचा > मैलो न मैल अखंड प्रवास..अन् भररस्त्यात सुरू झाल्या प्रसूती वेदना..मग...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: migrant worker clutches baby viral photo nashik marathi news