
लॉकडाउन वाढतच गेल्याने राज्यात अडकून पडलेले मजूर मिळेल, त्या वाहनाने काहीच नाही, तर पायी चालत आपल्या गावाकडे जात आहेत. अनेक परप्रांतीय मजूर रात्रंदिवस राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय मार्गावरून जात आहेत. दोन- तीन दिवसांपासून त्यांच्या संख्येत वाढच होत आहे. अशातच उद्याचे भवितव्य उराशी बाळगून आपल्या मुळगावी परततानाच तिला प्रसुती वेदना सुरू झाल्या...मग...
नाशिक : लॉकडाउन वाढतच गेल्याने राज्यात अडकून पडलेले मजूर मिळेल, त्या वाहनाने काहीच नाही, तर पायी चालत आपल्या गावाकडे जात आहेत. अनेक परप्रांतीय मजूर रात्रंदिवस राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय मार्गावरून जात आहेत. दोन- तीन दिवसांपासून त्यांच्या संख्येत वाढच होत आहे. अशातच उद्याचे भवितव्य उराशी बाळगून आपल्या मुळगावी परततानाच तिला प्रसुती वेदना सुरू झाल्या...मग...
गोंडस बाळाला दिला जन्म
नाशिक शहरातून मध्य प्रदेशातील सतना या आपल्या मुळ गावी पायी परतत असताना एका गरोदर महिलेची प्रसुती झाली आहे. या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला असून बाळ व आई सुखरूप असल्याची माहिती पोलीसांनी दिली . भररस्त्यात या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि रस्त्यातच तिची प्रसुती झाली. शकुंतला नावाच्या महिला या नाशिकमध्ये आपल्या परिवारासोबत राहतात. मात्र त्यांचे मूळ गाव हे मध्यप्रदेशातील असून लॉकडाऊनमध्ये अडकल्याने त्यांनी कुटुंबासोबतच पायी जाऊन मूळगावी राहण्याचा निर्णय घेतला आणि मग प्रवास सुरू केला.
हेही वाचा > कृषीमंत्र्यांची प्रार्थना अन् मौनव्रताला मारूतीराया पावणार का? मंदिरात तब्बल तीन तास ठिय्या
लहान मुले, वृद्ध यांच्या नशीबीही पायपीट
आपल्या मुळगावी परतण्यासाठी काहींनी दुचाकीवरून आपल्या गावी जाण्याचा मार्ग निवडला आहे. तर काही पायीच निघाले आहेत. लहान मुले, वृद्ध यांच्या नशीबीही पायपीट आली आहे. गावी निघालेल्या या नागरिकांना रस्त्यात काही ठिकाणी सेवाभावी संस्थांकडून अन्नदान मिळत आहे. काहींनी तात्पुरती खाण्याची व्यवस्था केली आहे. उन्हाळा असल्याने पाण्याची आवश्यकता भासत असल्याने मिळेल तेथून पाण्याच्या बाटल्या भरून त्या सोबत ठेवत आहेत.
हेही वाचा > 'त्याची' एंट्री होताच...रात्री ग्रामस्थांनी चक्क फोडले फटाके..अन् मग