esakal | बेपत्ता बांधकाम अभियंत्याचा मृतदेह गांधी तलावात!
sakal

बोलून बातमी शोधा

pramod patil.jpg

इंदिरानगर पोलिसांना त्यांची मोपेड गंगाघाटावरील एकमुखी दत्तमंदिराजवळ सापडली होती. मात्र, पाटील यांचा परिसरात कोठेही शोध लागला नव्हता. दोन दिवसांनी सोमवारी त्यांचा मृतदेह गांधी तलावात तरंगताना आढळला.

बेपत्ता बांधकाम अभियंत्याचा मृतदेह गांधी तलावात!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : राजीवनगर परिसरात राहणारे व बांधकाम अभियंत्या शनिवारपासून बेपत्ता होते ते...अन् तीन दिवसांनी त्यांचा मृतदेह सोमवारी (ता. 17) गंगाघाटावरील गांधी तलावावर तरंगताना आढळला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत नोंद करण्यात आली.

असा आहे प्रकार

प्रमोद परशराम पाटील (वय 40, रा. राजीवनगर, इंदिरानगर) असे त्यांचे नाव असून, इंदिरानगर पोलिसांत शनिवारी (ता. 15) बेपत्ता असल्याची नोंद आहे. पाटील यांनी 
आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रमोद पाटील शनिवारी सायंकाळी मोपेड घेऊन गेले होते. त्यांनी त्यांचा मोबाईलही घरीच ठेवला होता. कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केल्यानंतरही ते न सापडल्याने त्यांनी इंदिरानगर पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. इंदिरानगर पोलिसांना त्यांची मोपेड गंगाघाटावरील एकमुखी दत्तमंदिराजवळ सापडली होती. मात्र, पाटील यांचा परिसरात कोठेही शोध लागला नव्हता. दोन दिवसांनी सोमवारी त्यांचा मृतदेह गांधी तलावात तरंगताना आढळला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत नोंद करण्यात आली. ते एका बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरीला होते, तसेच घरात कोणताही वाद झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  

 हेही वाचा > सोशल मीडियाच्या युगात देखील 'बोहाडा'मुळे पारंपरिक लोककलेला नवीन उभारी!

हेही वाचा > ShivJayanti 2020 :  सातासमुद्रापार शिवजयंतीचा डंका...न्यूयॉर्कच्या भारतीय दूतावासात महाराजांना मानाचा मुजरा!