नुकसान झालेल्या भातपिकांचे त्वरित पंचनामे करा; आमदार कोकाटे यांचं इगतपुरी तहसीलदारांना पत्र

राम शिंदे 
Wednesday, 14 October 2020

तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये आदिवासी लोकांची शेती आहे. त्यांचा उदरनिर्वाह शेती या प्रमुख व्यवसायावरच अवलंबून असून त्यांचा इतर कोणताही व्यवसाय नसल्याने दूषित वातावरणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या भात शेतीवर करप्या,तुडतडा, मावा, पांढरा लाल टाका रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नाशिक/सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद-खेड गटात माझ्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेली इगतपुरी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये आदिवासी लोकांची शेती आहे. त्यांचा उदरनिर्वाह शेती या प्रमुख व्यवसायावरच अवलंबून असून त्यांचा इतर कोणताही व्यवसाय नसल्याने दूषित वातावरणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या भात शेतीवर करप्या, तुडतडा, मावा, पांढरा लाल टाका रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी सदर नुकसान झालेल्या गावांतील करपा बाधित भात पिकांचे त्वरित पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत याचे पत्र आमदार माणिकराव कोकाटे यांनी इगतपुरी तहसीलदारांना दिले आहे

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका द्याव्यात

त्यानंतर याच टाकेद खेड गटातील अनेक गावांमध्ये आदिम आदिवासी भूमिहीन, कातकरी,भिल्ल,समाजातील कुटुंबांना अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका लवकरात लवकर देण्यात याव्यात. इगतपुरी तालुक्यातील असलेली गावे अतिदुर्गम व मोठ्याप्रमाणात आदिवासी कातकरी व भूमिहीन लोकसंख्येचे असून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना मजुरी शिवाय कोणतेही साधन नाही त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबांची उपजीविका भागविण्यासाठी शासनाच्या अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत मुबलक प्रमाणात इष्ठांक उपलब्ध करून प्रत्येक लाभार्थ्यांस लवकरात लवकर शिधापत्रिका उपलब्ध करून द्यावी.

खावटी अनुदान योजना

त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाची आदिवासी खावटी अनुदान योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. दरम्यान याच टाकेद खेड गटात अनेक गावे ही अतिदुर्गम डोंगर दऱ्यांमध्ये व मोठ्याप्रमाणात आदिवासी लोकसंख्येची आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने खावटी अनुदान योजना 2020 , 2021 चालू केली असून खऱ्या अर्थाने आदिवासी लोकांना या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आपण आपल्या स्थरावरून आदिवासी खावटी अनुदान योजना प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आमदार माणिकराव कोकाटे यांनी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद खेड गटातील बहुतांश गावे ही माझ्या सिन्नर मतदारसंघात असून अनेक आदिवासी गावांमध्ये बहुतांश शेतकऱ्यांच्या भात पिकांचे करप्या रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आज शेतकरी पूर्णपणे खचला आहे ,या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी शासनस्तरावर प्रयत्न करावे तसेच भूमीहीन कातकरी कुटुंबांना अंत्योदय ,प्राधान्य शिधापत्रिका तात्काळ देऊन आदिवासी खावटी अनुदान योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी याचे पत्र इगतपुरी तहसीलदारांना दिले आहे.
- माणिकराव कोकाटे ,आमदार सिन्नर विधानसभा  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Kokates letter to tehsildar for completion of various works nashik marathi news