"तिथीनुसार शिवसैनिकांनी शिवजयंती केल्यास दुटप्पीपणा"

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

शिवसैनिकांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा दुटप्पीपणा स्वीकारल्यास तो मुख्यमंत्र्यांना शोभणारा नसेल, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी जातील. तेव्हा राज्यात एकच शिवजयंती साजरी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली.

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी जातील. तेव्हा राज्यात एकच शिवजयंती साजरी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली. तसेच, शिवसैनिकांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा दुटप्पीपणा स्वीकारल्यास तो मुख्यमंत्र्यांना शोभणारा नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळाले, पण त्याचा फायदा समाजाला होत नाही

शिवसंग्रामचा  वर्धापन दिनाचा सोहळा 8 फेब्रुवारीला दुपारी साडेतीनला परेल, मुंबई येथील नरे पार्क मैदानावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याच्या तयारीच्या बैठकीसाठी नाशिकमध्ये आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की मराठा समाजाला आरक्षण मिळाले. पण, त्याचा फायदा समाजाला होत नाही. नियुक्तिपत्र देऊनही नोकरी न मिळाल्याने आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती तत्काळ द्यावी. त्याचप्रमाणे सारथी संस्थेच्या अनागोंदी कारभाराची सखोल चौकशी करावी. संस्थेसाठी चांगली समिती द्यावी. संस्थेचा थांबलेला निधी पुन्हा सुरू करून शिष्यवृत्ती देण्याची व्यवस्था करावी. 
 

हेही वाचा > 'ज्यांना' संकटग्रस्त अबला 'तो' समजत होता...त्या तर चक्क...विश्वास नांगरे पाटलांचा फंडा यशस्वी! 

गड-किल्ल्यांसाठी राज्याची व्यवस्था आवश्‍यक 
गड-किल्ल्यासंबंधी राज्य सरकारने स्वीकारलेल्या धोरणाचे मी स्वागत करतो. मात्र, त्यात सुरक्षाव्यवस्था, केंद्रीय विभागाच्या ताब्यातील गड-किल्ल्यांसाठी स्वतंत्र दल याची स्पष्टता नाही. केंद्राकडून महाराष्ट्राने सगळे किल्ले ताब्यात घ्यावेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे. त्या माध्यमातून पुनर्विकास, दुरुस्ती, व्यवस्था आणि पावित्र्य राखणे अशी व्यवस्था करावी. 2005 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे यासंबंधाने मी मागणी केल्यावर एक बैठक झाली. मात्र, पुढे काहीही झालेले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. 

हेही वाचा > धक्कादायक! क्लासमध्ये 'ती" शिकवायची मुलांना..बऱ्याच वेळानंतर क्लासचा दरवाजा उघडला तेव्हा धक्काच...
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Vinayak Mete on ShivJayanti Nashik Marathi Political News