esakal | आमदारांना सायकल चालविणे पडले चांगलेच महागात!.. काय घडले?
sakal

बोलून बातमी शोधा

maulana mufti.jpg

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले. साथरोग फैलावसाठी रॅली कारणीभूत ठरू शकते, अशी तक्रार पोलिस शिपाई विलास सूर्यवंशी यांनी दिली. 

आमदारांना सायकल चालविणे पडले चांगलेच महागात!.. काय घडले?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक / मालेगाव :  जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले. साथरोग फैलावसाठी रॅली कारणीभूत ठरू शकते, अशी तक्रार पोलिस शिपाई विलास सूर्यवंशी यांनी दिली. 

काय घडले नेमके?

शहरात कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर साथरोगाचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे. जमावबंदी आदेश असताना इंधन दरवाढीच्या निषेधार्थ विनापरवाना सायकल रॅली काढण्याच्या आरोपावरून एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्यासह 23 जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा > डॉक्टरच निघाला विश्वासघातकी...उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत केला 'असा' धक्कादायक प्रकार

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

आमदार मौलाना मुफ्ती यांनी शुक्रवारी (ता.26) दुपारी सायकल रॅली काढली होती. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले. साथरोग फैलावसाठी रॅली कारणीभूत ठरू शकते, अशी तक्रार पोलिस शिपाई विलास सूर्यवंशी यांनी दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. 

INSIDE STORY : मास्टरमाइंड दाऊदच्या नादाला लागून मेमन कुटुंबीय कसे झाले उध्वस्त? जाणून घ्या देशद्रोही कुटुंबाविषयी..​