
क्वारंटाइन काळात या आमदारांनी असा काही कारनामा केलाय की विरोधकांच्या हातात त्यांनी पुन्हा आयते कोलीत दिले आहे. कॉंग्रेसचे महानगर प्रवक्ते साबीर गोहर यांनी मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
नाशिक / मालेगाव : मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद ईस्माइल यांना दिल्ली व आग्रा येथील प्रवासाची पार्श्वभूमी असल्याने 1 एप्रिलपासून 14 एप्रिलपर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. पण हे आमदार काही ऐकेना...वाचा तरी काय कारनामा केलाय त्यांनी..की मनपा अधिकाऱ्यांनीही समज दिली.
मोठ्या प्रमाणावर टिकेला सामाेरे
नयापुरा भागातील कार्यालयात आमदार मौलाना मुफ्ती यांनी रविवारी (ता.5) सायंकाळी भेट दिली. क्वारंटाइन असलेल्या निवासस्थानापासून काही अंतरावरच हे कार्यालय आहे. त्यांचे समर्थक असलेल्या जाॅंनिसार कायदेसालार या व्हाट्सॲप ग्रुपने गरीबांच्या मदतीसाठी साहित्य तयार केले होते. हे साहित्य वाटप तयारीची पहाणी व कार्यकर्त्यांसमवेत फोटोसेशनमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर टिकेला सामाेरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे यावेळी कार्यालयात बहुसंख्य कार्यकर्ते होते. कार्यकर्त्यांनीच हे छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल केल्यानंतर या वादाला तोंड फुटले. क्वारंटाइन काळात आमदारांनी घराजवळील नयापुरा भागातील कार्यालयात जाऊन जाॅंनिसार कायदेसालार या व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातुन करण्यात येणाऱ्या मदत वाटपाचे साहित्य व कार्यकर्त्यांसमवेत फोटोसेशन केल्याने ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विरोधकांच्या हातात त्यांनी पुन्हा आयते कोलीत दिले आहे. कॉंग्रेसचे महानगर प्रवक्ते साबीर गोहर यांनी मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
होम क्वारंटाइन असतानाही फोटोसेशन, मनपा अधिकाऱ्यांनी दिली समज
महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस, सहाय्यक आरोग्याधिकारी डॉ. भिमराव त्रिभुवन यांनी मौलाना मुफ्ती यांची भेट घेऊन त्यांना समज दिली. क्वारंटाइनचे पालन करा. अन्यथा स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करावे लागेल असा सल्ला त्यांनी दिला. त्यावर आगामी काळात खबरदारी घेऊ असे मौलाना मुफ्ती यांनी सांगितले. यापुर्वी शहर शांततेबद्दल त्यांनी प्रक्षोभक वक्तव्य केले होते. पाठोपाठ समर्थकांसह सामान्य रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत गोंधळ घातला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. हे वाद शमत नाही तोच नवीन वादाला तोंड फुटले आहे.
हेही वाचा > CoronaFighters : "आधी लढा कोरोनाशी नंतरच लगिन!''...असा निर्धार 'त्यांचा' पक्का
विविध राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था व संघटनांकडून प्रकाराबद्दल टिका
दरम्यान या प्रकारानंतर साबीर गोहर यांनी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. सपना ठाकरे, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. भिमराव त्रिभुवन यांना पत्र पाठवून होम क्वारंटाइन असताना संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या, गर्दीत जाणाऱ्या व शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या आमदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. शहरातील विविध राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था व संघटनांनीही या प्रकाराबद्दल टिका केली आहे.
हेही वाचा > photos : 'सरकार मायबाप या संकटातून बाहेर काढा!'...शेतक-यांची आर्त हाक