उद्यानाच्या बाहेर विद्यार्थिनींची छेडछाड...मनसे पदाधिकाऱ्यांनी पाहिले..अन् मग..

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 12 February 2020

शालिमार येथील एका शाळेतील विद्यार्थिनींची छेड काढण्याचा प्रकार घडला. याची माहिती मनसे पदाधिकारी मनोज घोडके, निखिल सरपोद्दार, अंकुश पवार यांना मिळाली. त्यांनी शाळेच्या बाहेर आडोशाला लपून खात्री केली. काही टवाळखोर नेहरू उद्यानाच्या बाहेर थांबून विद्यार्थिनींची छेड काढत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी... 

नाशिक : शालेय विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. 11) दुपारी बाराच्या सुमारास शालिमार येथील शाळेच्या बाहेर चांगलाच चोप दिला. 

असा घडला प्रकार...

शालिमार येथील एका शाळेतील विद्यार्थिनींची छेड काढण्याचा प्रकार घडला. याची माहिती मनसे पदाधिकारी मनोज घोडके, निखिल सरपोद्दार, अंकुश पवार यांना मिळाली. त्यांनी शाळेच्या बाहेर आडोशाला लपून खात्री केली. काही टवाळखोर नेहरू उद्यानाच्या बाहेर थांबून विद्यार्थिनींची छेड काढत असल्याचे लक्षात आले. त्यांनी टवाळखोरांना चोप दिला. परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. टवाळखोरांना अशी अद्दल घडणे आवश्‍यक असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अशा घटनांना आळा बसवा, यासाठी पोलिसांनी शाळा भरणे आणि सुटण्याच्या वेळेत पोलिस कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. 

हेही वाचा > मुलाचे निधन एका बाजूलाच...सुन अन् सासू- सासऱ्यांचं भलतचं चाललयं!

सर्वांनी काळजी घेणे आवश्‍यक

काही टवाळखोर छेड काढत असल्याची तक्रार माझ्या मुलीने केली. अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुलीस शाळेत सोडण्यास जाण्याचा नित्यक्रम केला आहे. विद्यार्थी, महिला सध्या सुरक्षित नसल्याने सर्वांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे. - पालक 

हिंगणघाटसारखे प्रकार घडू नये यासाठी मनसेकडून बुधवार (ता. 12)पासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील विविध शाळेबाहेर विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्यांना समजून सांगू. ऐकले नाही तर मनसे स्टाइलने अद्दल घडविणार आहोत. - मनोज घोडके, मनसे पदाधिकारी 

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS activists beat who molest with girls Student Nashik Marathi News