esakal | अपार्टमेंटमधून मोबाईलची चोरी; सीसीटीव्हीत संशयित स्पष्ट दिसूनही पोलीसांकडून टाळाटाळ?
sakal

बोलून बातमी शोधा

sakal (79).jpg

अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज‌ चेक करीत वडीलांनी पोलिस ठाणे गाठले. तेव्हा पोलिसांनी नोंद करून घेण्यास टाळाटाळ केली. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

अपार्टमेंटमधून मोबाईलची चोरी; सीसीटीव्हीत संशयित स्पष्ट दिसूनही पोलीसांकडून टाळाटाळ?

sakal_logo
By
प्रशांत कोतकर

नाशिक : अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज‌ चेक करीत वडीलांनी पोलिस ठाणे गाठले. तेव्हा पोलिसांनी नोंद करून घेण्यास टाळाटाळ केली. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

सीसीटीव्हीत संशयित स्पष्ट; मुंबई नाका पोलिसांकडून टाळाटाळ 
तिडके कॉलनीतील मित्र सहकार भवनामागील गणेश अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर आठमधील रहिवासी धनंजय क्षीरसागर हे पत्नीसह मंगळवारी सकाळी सव्वानऊ ते पावणेदहाच्या दरम्यान कामानिमित्त फ्लॅट क्रमांक ५ मध्ये आले. दरम्यानच्या काळात दरवाजा उघडा बघून संशयित त्यांच्या फ्लॅटमध्ये घुसला. त्याने मोबाईल नेत पसार झाला. दहाला पुन्हा क्षीरसागर हे घरात गेले असता, मोबाईल चोरीस गेला असल्याचे लक्षात आले. त्यांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज‌ चेक करीत वडील विजय क्षीरसागर यांच्यासह मुंबई नाका पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी नोंद करून घेण्यास टाळाटाळ केली. तब्बल पाच तास नोंद होत नसल्याचे लक्षात येताच विजय क्षीरसागर यांनी या संदर्भात जाब विचारला. त्यानंतर नोंद घेण्यास सुरवात केली. सायंकाळी पाचपर्यंत नोंद घेण्याची प्रक्रिया सुरूच होती. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

जाब विचारल्यानंतर नोंद 

गेल्या वर्षी येथील अपार्टमेंटमधील रहिवासी प्रशांत कोतकर यांचा देखील मोबाईल चांडक सर्कल रस्त्यावर चोरीस गेला होता. त्याचाही अद्याप शोध लागलेला नाही. तिडके कॉलनीतील गणेश अपार्टमेंटमध्ये मंगळवारी (ता.२३) सकाळी साडेनऊच्या सुमारास फ्लॅटमधून मोबाईलची चोरी केल्याची घटना घडली. संशयित सीसीटीव्ही फुटेज‌मध्ये आला असून, या संदर्भात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गेलेल्या तक्रारदारास तक्रार नोंदणीसाठी सकाळी अकरा ते चार पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. तक्रारदाराच्या वडिलांनी नोंद का करून घेत नाही म्हणून जाब विचारल्यानंतर नोंद करण्यात आली. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले