esakal | रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ
sakal

बोलून बातमी शोधा

sakal (34).jpg

पिंपळगावपासून जवळच असलेली कारसूळ येथील अल्पवयीन दीपिका अजय ताकाटे सोमवारी (ता. १५) पिंपळगाव महाविद्यालयात गेली. मात्र, सायंकाळ झाली तरी दीपिका घरी न आल्याने तिच्या परिवारात खळबळ उडाली होती. नंतर पोलीस तपासात अखेर गुढ उकलले आहे.

रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

sakal_logo
By
दीपक आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) :  पिंपळगावपासून जवळच असलेली कारसूळ येथील अल्पवयीन दीपिका अजय ताकाटे सोमवारी (ता. १५) पिंपळगाव महाविद्यालयात गेली. मात्र, सायंकाळ झाली तरी दीपिका घरी न आल्याने तिच्या परिवारात खळबळ उडाली होती. नंतर पोलीस तपासात अखेर गुढ उकलले आहे.

पोलिस तपासानंतर मृत्यूचे गूढ उकलले
निफाड तालुक्यातील कारसूळ येथील अल्पवयीन दीपिका अजय ताकाटे (वय १६) हिचा मृतदेह मंगळवारी (ता. १६) आहेरगाव येथील डाव्या कालव्यात आढळला; परंतु गळा आवळल्याच्या खुना आढळल्याने मृत्यूचे गूढ कायम होते. पोलिस तपासानंतर मृत्यूचे गूढ उकलले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळगावपासून जवळच असलेली कारसूळ येथील अल्पवयीन दीपिका अजय ताकाटे सोमवारी (ता. १५) पिंपळगाव महाविद्यालयात गेली. मात्र, सायंकाळ झाली तरी दीपिका घरी न आल्याने तिच्या परिवारात खळबळ उडाली होती. मंगळवारी (ता. १६) दीपिकाचा मृतदेह आहेरगाव येथील पालखेड डाव्या कालव्यात सापडल्यानंतर दीपिकाची आत्महत्या की हत्या, हे स्पष्ट होत नव्हते. त्यात गळा आवळल्याच्या खुणा आढळल्याने पोलिस यंत्रणा अधिकच सतर्क झाली. पिंपळगाव पोलिस पथकाने तपास केल्यानंतर दीपिकाची आत्महत्या नाही तर मैत्रीच्या संबंधातून हत्या झाल्याचे समोर आले.

आरोपी विक्रमचे मैत्रीचे संबंध

दीपिकाच्याच नात्यातला असलेला संशयित आरोपी विक्रम गोपीनाथ ताकाटे व त्याचा मित्र सोमनाथ दत्तात्रय निफाडे यांनी हत्या केल्याचे समोर आले. दीपिका व संशयित आरोपी विक्रम यांचे मैत्रीचे संबंध असल्याने ती विक्रमकडे विविध हट्ट करायची. या हट्टाला कंटाळून विक्रमने दीपिकाला पिक-अप वाहनातून सटाणा-ताहाराबाद रस्त्यात सोमवारी (ता. १५) सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान मित्राच्या सहाय्याने नेले. सुरवातीला दीपिकाचा ओढणी व दोरीने गळा आवळला. त्यानंतर आहेरगाव येथील पालखेड कालव्यात रात्री दीडच्या सुमारास तिचा मृतदेह फेकून दिला. मंगळवारी सकाळी दीपिकाचा मृतदेह स्थानिकांना आढळून आला. 

हेही वाचा - अखेर 'त्या' तरुणीच्या मृ्त्यूचे गूढ उकलले; पोलिसांकडून २४ तासात संशयितांना बेड्या 

पिंपळगाव पोलिसांकडून २४ तासांत संशयितांना बेड्या 

पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी केलेल्या तपासात विक्रम व सोमनाथ यांनीच तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपासकामात सहाय्यक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे, उपनिरीक्षक पप्पू कादरी, पोलिस नाईक रवी बारहाते, पप्पू देवरे, नितीन जाधव, अमोल जाधव, मिथुन घोडके, उषा वाघ आदी सहभागी होते. 

हेही वाचा - इगतपुरीच्या ३०० फूट खोल दरीत तब्बल ११ तासांचा थरार! अखेर रेस्क्यू टिमच्या प्रयत्नांना यश

go to top