esakal | काय सांगता! बारा हजारांहून अधिक मतदान मशिन नष्ट होणार 
sakal

बोलून बातमी शोधा

voting .jpg

देशातील २००६ पूर्वीच्या विविध निवडणुकांत वापरलेली १२ हजारांहून अधिक मतदान मशिन नष्ट करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता.२) आंध्र प्रदेश व पुण्याला ही मशिन पाठविण्यात आली.

काय सांगता! बारा हजारांहून अधिक मतदान मशिन नष्ट होणार 

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : देशातील २००६ पूर्वीच्या विविध निवडणुकांत वापरलेली १२ हजारांहून अधिक मतदान मशिन नष्ट करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता.२) आंध्र प्रदेश व पुण्याला ही मशिन पाठविण्यात आली.

बारा हजारांहून अधिक मतदान मशिन नष्ट होणार 

देशात २००६ पर्यत निवडणुकांसाठी एम-१ प्रकारची मतदान मशिन वापरली जात होती. सध्या त्यांचा वापर होत नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही पारंपरिक मतदान मशिन बंद करण्याचा तसेच नष्‍ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उत्पादक कंपनीकडे संबधित मशिन नष्ट करण्यासाठी पाठविली जाणार आहे. त्यानुसार शुक्रवारी पाच हजार ९५२ बॅलेट युनिट आणि सहा हजार २७३ सीयू मशिन त्या त्या उत्पादक कंपन्यांना पाठविण्यात येणार आहे. त्यातील ५७० मशिन पुण्याला, तर उर्वरित १२ हजार ७९५ मशिन तिरुपती (आंध्र प्रदेश) येथे पाठविली जाणार आहेत. १६ ट्रकद्वारे हे मशिन शुक्रवारपासून पाठविण्यास सुरवात झाली.  

हेही वाचा > ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल