esakal | मन हेलावणारी घटना! मरणही एकत्रच अनुभवण्याचा मायलेकांचा निर्णय; घटनेने परिसरात खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

एस.टी. वाहक 2.jpg

मध्यरात्रीची वेळ...रविवारी (ता. 28) धक्कादायक घटना घडली. एस. टी. वाहक यांनी एकुलता एक मुलासह रेल्वेखाली आत्महत्या केली. मायलेकाच्या या धक्कादायक निर्णयाने परिसरात खळबळ उडाली. वाचा काय घडले?

मन हेलावणारी घटना! मरणही एकत्रच अनुभवण्याचा मायलेकांचा निर्णय; घटनेने परिसरात खळबळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (लासलगाव) मध्यरात्रीची वेळ...रविवारी (ता. 28) धक्कादायक घटना घडली. एस. टी. वाहक यांनी एकुलता एक मुलासह रेल्वेखाली आत्महत्या केली. मायलेकाच्या या धक्कादायक निर्णयाने परिसरात खळबळ उडाली. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

रविवारी (ता. 28) मध्यरात्रीच्या सुमारास लासलगाव येथे धक्कादायक घटना घडली. लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ भुसावळकडे जाणाऱ्या मार्गावर कि.मी. 233 च्या पोल क्र. 22/23 च्या दरम्यान मध्यरात्री एकमेकांचे हात ओढणीने बांधलेल्या अवस्थेत रेल्वेखाली ऊडी मारुन मायलेकाने जीवनयात्रा संपवली. अंजली भुसनळे व उत्कर्ष भुसनळे (27) (रा.विठ्ठलनगर, निलंबरी कॉम्लेक्स, औरंगाबाद रोड) असे मृत मायलेक. अंजली ह्या 15/16 वर्षांपासून मयत पतीच्या जागेवर येवले येथे अनुकंपावर नोकरीला होत्या. तर मुलगा उत्कर्ष हा नाशिक येथे नोकरीला होता. लॉकडाऊननंतर घरुनच काम करत होता. 3/4 महिन्यांपुर्वीच लॉकडाऊनमध्ये त्याचा विवाह झाला होता. यावेळी कुटुंबाने पाळलेला पोपट ही सोबत होता. सुदैवाने त्याला दुखापत झाली नाही. दिवस ऊजाडेपर्यंत तो त्यांच्या मृतदेहाजवळ आढळुन आला. 

हेही वाचा > मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

घटनेप्रकरणी परिसरात खळबळ उडाली असून त्याच्या आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्टच आहे. लासलगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संबंधित घटनेबाबत पोलीस कसुन तपास करत आहे. 

हेही वाचा >  'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

संपादन - ज्योती देवरे

go to top