लेकीचा दुसरा जन्म! वर्षभरापासून "ती" बेपत्ता...अन् भेटली तेव्हा... 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

सांडूनगर येथील निकिता आपल्या आईसोबत प्लॅस्टिक कचरा वेचण्याचे काम करत होती. वडील नसल्याने त्यातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. निकिता ही वर्षभरापूर्वी अचानक बेपत्ता झाली होती. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. कोणताही पुरावा हाती लागत नसल्याने पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पुष्पा आरणे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

नाशिक : शहरातील सांडूनगर येथून वर्षभरापूर्वी बेपत्ता झालेल्या निकिता धानू जाधव (वय 11) या अल्पवयीन मुलीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी शोध लावत तिच्या आईच्या ताब्यात दिले आहे. तसेच निकिताचा पुढील शिक्षणाचा खर्च गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बर्डे यांनी उचलला असून, तिला आदर्श कन्या विद्यालयात प्रवेश दिला आहे. 

आईसोबत प्लॅस्टिक कचरा वेचण्याचे काम करायची...

सांडूनगर येथील निकिता आपल्या आईसोबत प्लॅस्टिक कचरा वेचण्याचे काम करत होती. वडील नसल्याने त्यातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. निकिता ही वर्षभरापूर्वी अचानक बेपत्ता झाली होती. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. कोणताही पुरावा हाती लागत नसल्याने पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पुष्पा आरणे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. संबंधित मुलगी ही सेंट कॅथरिन्स होम, अंधेरी येथे मिळून आली. तिला बुधवारी (ता. 12) विभागीय पोलिस अधिकारी अरुंधती राणे यांच्या उपस्थितीत आईच्या ताब्यात देण्यात आले. सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बर्डे यांनी शिक्षणाचा खर्च उचलत तिला शहरातील आदर्श कन्या विद्यालयात दाखल केले आहे. 

हेही वाचा > नवविवाहितेला मुंबईत विकायचा डाव...नवरा अन् पहिल्या बायकोची काळी कृत्ये!

निकिताच्या भेटीने आई भारावली 

निकिता बेपत्ता झाल्याने काही बरे-वाईट झाले नसेल ना? या विचाराने मी खचले होते. पोलिसांनी माझ्या निकिताला पुन्हा आणून दिले. तिचा दुसरा जन्म झाल्याचा आनंद होत आहे. - बसंती जाधव, निकिताची आई 

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother daughter met again with the help of the police Nashik Marathi News