esakal | "जग सोडून गेल्यानंतरही माझा सागर माझी काळजी करतोय" शहीद मुलाची तरतूद बघून आई भारावली!
sakal

बोलून बातमी शोधा

shahid son.jpg

शोभा व माधव चौधरी यांचा सागर एकुलता एक मुलगा. सैन्यात भरती होऊन आठ वर्षे झाली होती, नुकताच दोन वर्षांपूर्वी विवाह देखील झाला होता अशात कुपवाड्यात कर्तव्यावर असताना 2019 साली सागर यांना वीरमरण आले. आई-वडिलांसह पत्नी चा आधार हरवला. दुःखाचा हा आवंढा गिळत आई व कुटुंब सागरच्या आठवणीत जीवन व्यथित करत होते.

"जग सोडून गेल्यानंतरही माझा सागर माझी काळजी करतोय" शहीद मुलाची तरतूद बघून आई भारावली!

sakal_logo
By
हर्षल गांगुर्डे : सकाळवृत्तसेवा

नाशिक / गणुर : शोभा व माधव चौधरी यांचा सागर एकुलता एक मुलगा. सैन्यात भरती होऊन आठ वर्षे झाली होती, नुकताच दोन वर्षांपूर्वी विवाह देखील झाला होता अशात कुपवाड्यात कर्तव्यावर असताना 2019 साली सागर यांना वीरमरण आले. आई-वडिलांसह पत्नी चा आधार हरवला. दुःखाचा हा आवंढा गिळत आई व कुटुंब सागरच्या आठवणीत जीवन व्यथित करत होते.

शहीद मुलाला कुटुंबाचीही तितकीच काळजी

"मुलगा देशासाठी शहीद झाला, कायम कुटुंबाची काळजी करणारा 'सागर' आज आमच्यात नाही पण त्याने आमच्या भविष्यासाठी करून ठेवलेली तरतूद व देशासाठी पत्करलेले वीरमरण बघून आजही डोळ्यात पाणी येते" हे उदगार आहेत शोभा चौधरी यांचे, ज्यांनी आपला एकुलता एक तरुण मुलगा देशासाठी अर्पण केला. दु:खाचा हा आवंढा गिळत कुटुंब त्यांच्या आठवणीत जीवन व्यथित करत असताना लॉकडाऊन काळात चांदवड उपविभागाचे डाक सर्व्हेक्षक अनिल सोनवणे भरवस-पोस्ट गोंदेगाव, विंचूर ता. निफाड येथे पोहचले. "आपल्या शहीद मुलाने आपल्याला वारस लावत टपाल जीवन विमा काढून ठेवला होता व त्याची रक्कम अकरा लाख नव्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये आपल्याकडे प्रदान करतांना आम्ही समाधान व शहीद सागर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहोत" असे सोनवणे यांनी सांगताच, "जग सोडून गेल्यानंतरही माझा सागर माझी काळजी करतोय" असे म्हणत शहीद सागर यांच्या आई भावुक झाल्या. टपाल विभागात शहीद सागर यांनी आईला वारस लावून काढलेली विमा रक्कम पोस्टमन च्या हातून स्वीकारताना त्या बोलत होत्या. 

हेही वाचा > मरणानंतरही मिळेना मोक्ष... हजारो अस्थीकलश झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ..कारण वाचून व्हाल थक्क 

जीवन विमा व लाभ मिळवून देण्यासाठी धडपड

खाजगी विमा, पॉलिसी, बँका यांच्या भुरळ घालणाऱ्या ऑफर व नंतर उघड होणारे घोटाळे बघता टपाल विभागाचा हा जीवन विमा व त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिकारी-कर्मचारी यांची धडपड टपाल विभागाची प्रतिमा उंचावणारी ठरत असल्याचे यावेळी कुटूंबियांनी बोलून दाखवले. लॉकडाऊन काळात ही विमा रक्कम लवकरात लवकर कुटूंबियांना पोहचविण्यासाठी मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे, मालेगाव डाक विभागाचे अधीक्षक नागेश्वर रेड्डी, चांदवड उपडाक विभागाचे डाक निरीक्षक नितिन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव प्रधान डाकघर पोस्टमास्तर संदीप देसले, विंचूर पोस्टमास्तर प्रवीण भावसार, डाक सहाय्यक किशोर गांगुर्डे, जयेश मोरे प्रयत्नशील होते. 

हेही वाचा > आजी-आजोबांची भेट.. अवघड वळणाचा घाट.. जणू वाट बघत होता तिघांचा काळ