ह्रदयद्रावक! आई कुठे शोधू तुला गं? लॉकडाऊनमध्ये आईला भेटण्याची धडपड ह्रदय हेलावणारी! 

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 20 एप्रिल 2020

स्मृतिभ्रंश झालेली आई घरातून निघून जाते, कुटुंबीय हतबल होऊन तिचा शोध घेतात; पण ती असते शंभर किलोमीटर दूर येवल्यात. त्यानंतर जे काही घडले ते अगदी ह्रदय हेलावणारे होते.

नाशिक / येवला : स्मृतिभ्रंश झालेली आई घरातून निघून जाते, कुटुंबीय हतबल होऊन तिचा शोध घेतात; पण ती असते शंभर किलोमीटर दूर येवल्यात. त्यानंतर जे काही घडले ते अगदी ह्रदय हेलावणारं होते.

अशी घडली घटना

भुसावळ येथील सरला भोळे ही महिला मानसिक आजाराने घरातील कोणालाही न सांगता निघून आली होती. चांदगाव येथे आढळलेली ही महिला भुसावळ येथील असल्याचे समजले. ती काहीही सांगू शकत नव्हती; मात्र तिच्याजवळच्या मतदान कार्डद्वारे ती आँडर्नस फॅक्‍टरी भुसावळ येथील असल्याचे स्पष्ट झाले. चांदगाव येथील पत्रकार व नेहरू युवा केंद्राचे युवा स्वयंसेवक मुकुंद आहिरे यांनी त्या महिलेची माहिती नेहरू युवा केंद्राचे लिपिक सुनील पंजे यांना दिली. पंजे हे मूळचे जळगावचे असून, सध्या नाशिक यथे कार्यरत आहेत. त्यांनी या महिलेची माहिती सोशल मीडियाद्वारे भुसावळ येथील रणजितसिंग राजपूत यांना दिली. राजपूत यांनी त्या पत्यावरून महिलेच्या कुटुंबाशी संपर्क साधला असता, शरद भोळे यांनी आपलीच आई असून, आईची मानसिक स्थिती चांगली नसल्याने ती घरातून बाहेर पडल्याची व तिच्यावर उपचारही सुरू असल्याचे सांगितले. त्यातच लॉकडाउनमुळे तिला कसे नेणार, हा प्रश्‍न भोळे यांना पडला. 

लॉकडाउन असूनही आईला घेण्यासाठी येण्याचे पत्र उपलब्ध
यासंदर्भात पत्रकार मुकुंद आहिरे यांनी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष विंचू यांना माहिती दिली. त्यांनी पोलिसांना याबाबत तत्काळ माहिती देऊन मदत घेण्याचे सांगितले. त्यानुसार आहिरे यांनी रात्रीच पोलिसांना माहिती कळविली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ती गावाबाहेर गेली होती. शोधाशोध केल्यावर ती कुसूर गावाच्या पुढे भेटली. तालुका पोलिस ठाण्याचे ज्ञानेश्‍वर दराडे व पारखे यांनी संबंधित महिलेच्या मुलांना लॉकडाउन असूनही आईला घेण्यासाठी येण्याचे पत्र उपलब्ध करून दिले. त्यामुळे त्यांचा दुसरा मुलगा पुण्याहून येथे येऊन आईला घेऊन गेला. आई व मुलांची या निमित्ताने पुन्हा एकदा भेट झाली. सध्या कोरोनामुळे गावागावांचे रस्ते बंद आहेत. अनोळखी व्यक्तींना प्रवेश दिला जात नाही. अशा परिस्थितीत मदतीला आलेल्यांचा गौरव महिलेच्या मुलांनी केला. स्वयंसेवक व पोलिस यंत्रणेचे या वेळी त्यांनी आभार मानले. 

हेही वाचा > एक सुशिक्षित डॉक्टर अन् तान्ह्या जुळ्या मुलांची आई आणि आत्महत्या??? गूढ काय?

मात्र काही पत्रकार व नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून आईचा सुगावा लागतो आणि पोलिसांच्या मदतीने ताटातूट झालेल्या मायलेकांची पुन्हा भेटीची घटना नुकतीच घडली. 

हेही वाचा > GOOD NEWS : कोरोनापासून बचाव करणाऱ्या 'सुरक्षाकवच'ची होतेय नाशिकमध्ये निर्मिती...पाहा हा व्हिडिओ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother who left home due to dementia Meeting with family nashik marathi news