VIDEO : टोल नाक्यावर ट्रॅफिकमध्ये अडकली रुग्णवाहिका; खासदारांनी बघताच क्षणी काय केले पाहा

गोपाळ शिंदे
Wednesday, 26 August 2020

वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका आणि त्यातून मार्ग काढत रुग्णालयापर्यंत रुग्णाला पोहचण्यात उशीर होतो.अनेकदा गरोदर स्त्रिया, अपघातातील जखमी किंवा गंभीर रुग्णांना ठराविक वेळेत तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते. मात्र अशातही माणुसकी जिवंत आहे याचे ताजे उदाहरण आज मुंबई-नाशिक महामार्ग येथे पाहायला मिळाले. वाचा काय घडले?

नाशिक / घोटी : वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका आणि त्यातून मार्ग काढत रुग्णालयापर्यंत रुग्णाला पोहचण्यात उशीर होतो.अनेकदा गरोदर स्त्रिया, अपघातातील जखमी किंवा गंभीर रुग्णांना ठराविक वेळेत तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते. मात्र अशातही माणुसकी जिवंत आहे याचे ताजे उदाहरण आज मुंबई-नाशिक महामार्ग येथे पाहायला मिळाले. वाचा काय घडले?

खासदारांनी पाहिली वाहतूक कोंडीत अडकलेली रुग्णवाहिका

मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. रूग्ण वाहिका, वृद्ध यांना या वाहतुक कोंडीचा नेहमीच फटका बसला जातो. बुधवार ( ता. 26 ) दरम्यान खासदार हेमंत गोडसे मुंबईकडे रवाना होत असतांना त्यांचे लक्ष वाहतूक कोंडी मध्ये सापडलेल्या रुग्ण वाहिकेवर गेले. ते आपल्या सहकार्य समवेत वाहनाच्या खाली उतरून थेट वाहतूक कोंडी सुरळीत करतांना रुग्ण वाहिकेला मोकळी जागा करून दिली. 

टोल व्यवस्थापनाला धारेवर धरले
यानंतर टोल व्यवस्थापनाला धारेवर धरत यापुढे रुग्ण वाहिकांना वेगळी लेन ठेवण्यास सांगितले. खासदार गोडसे यांच्या तत्परतेने नाशिक येथील रुग्ण वाहिकेतील रुग्णाच्या नातेवाईकांनी आभार मानले. त्यांना आपला मोबाईल नंबर देत आवश्यक असल्यास फोन करण्यास सांगितले. 

हेही वाचा > ''पोलिस आयुक्त साहेब..पीएफच्या फाईलवर सही करा नाहीतर आत्महत्या'' पोलिस कर्मचाऱ्याने थेट कंट्रोललाच सांगितली आपबिती

वाहतूक कोंडीचा सगळ्यात जास्त फटका रुग्णवाहिकांना

अनेकदा रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने सर्वसामान्य हैराण होतात. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी असेल अशा कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी वेळेआधीच निघावे लागते. मात्र ते करूनही वेळेत पोहचणार की नाही याची खात्री कुणालाच नसते. या वाहतूक कोंडीचा सगळ्यात जास्त फटका रुग्णवाहिकांना बसतो.

हेही वाचा > संजीवनीदायक मालेगावच्या काढ्यामुळे 'अवघड जागेचं दुखणं' वाढतंय? वाचा डॉक्टरांचे मत​

रिपोर्ट - गोपाळ शिंदे

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Hemant Godse immediately released ambulance found in a traffic jam nashik marathi news