नाशिक रोड पाणीप्रश्‍नी कायमस्वरूपी तोडगा काढा; आयुक्त जाधव यांच्या सूचना

विक्रांत मते
Friday, 22 January 2021

नाशिक रोड विभागात होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यावरून शिवसेनेच्या आंदोलनानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यापाठोपाठ आयुक्त कैलास जाधव यांनी चेहेडी पंपिंग स्टेशनची पाहणी करून दूषित पाणीपुरवठा थांबविण्याबरोबरच वालदेवी नदीचे दूषित पाणी मिसळू न देण्याच्या स्पष्ट सूचना केल्या. 

नाशिक : नाशिक रोड विभागात होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यावरून शिवसेनेच्या आंदोलनानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यापाठोपाठ आयुक्त कैलास जाधव यांनी चेहेडी पंपिंग स्टेशनची पाहणी करून दूषित पाणीपुरवठा थांबविण्याबरोबरच वालदेवी नदीचे दूषित पाणी मिसळू न देण्याच्या स्पष्ट सूचना केल्या. 

नाशिक शहराला गंगापूर, मुकणे व दारणा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. दारणा धरणातून शहरासाठी दोनशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. दारणाचे पाणी चेहेडी पंपिंग स्टेशन येथून उचलले जाते; परंतु अळी व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आरक्षित पूर्ण पाणी उचलले जात नाही. गेल्या काही दिवसांपासून नाशिक रोडला दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या नगरसेवकांनी महासभेत राडा घातला. त्यानंतर महापौर कुलकर्णी यांनी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पाण्यावरून निर्माण झालेल्या प्रश्‍नाची दखल घेऊन आयुक्त जाधव यांनी चेहेडी पंपिंग स्टेशनची पाहणी केली. शहर अभियंता संजय घुगे, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, एस. एम. चव्हाणके, कार्यकारी अभियंता अविनाश धनाईत, विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, उपअभियंता राजेंद्र पालवे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

वालदेवीचा दूषित पाणीपुरवठा थांबवा 

नाशिक रोड विभागासाठी होणारा दूषित पाणीपुरवठा तातडीने थांबवावा, स्वच्छ पाण्यासाठी उपाययोजना कराव्यात, वालदेवी नदीचे दूषित पाणी नदीत मिसळू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्त जाधव यांनी केल्या. पिंपळगाव खांब मलनिस्सारण केंद्राच्या कामाची पाहणी करण्यात आली. मलनिस्सारण केंद्राचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Commissioner gave instructions to find a permanent solution to the Nashik Road water problem marathi news