''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

दिपक देशमुख
Thursday, 21 January 2021

काही दिवसांपूर्वी महामार्ग नूतनीकरण, डांबरीकरणावेळी गतिरोधक काढून टाकण्यात आल्याने ग्रामपंचायतीतर्फे महामार्गाची देखरेख करणाऱ्या इरॅकान सोमा कंपनीकडे १८ जानेवारीला गतिरोधक बसविण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. या पत्राला केराची टोपली दाखविल्यानेच आजपर्यंत चार अपघात घडल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. 

झोडगे (नाशिक) : मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक (एमएच ४७, बीएम ५०८९)ने झोडगेकडून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी (एमएच १९, डीएन २३२७)ला धडक दिली. अशोक सोनवणे (रा. शिदवाडी, ता. चाळीसगाव) गंभीर जखमी झाले, तर पत्नी सायत्राबाई सोनवणे (वय ३५) जागीच ठार झाल्या. 

चाकाखाली येऊन जागीच मृत्यू

डहाणू येथून नागपूरकडे चिकू भरून जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने सायत्राबाई सोनवणे यांचा चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली. जखमींना मालेगाव येथे हलविण्यात आले. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करतेवेळी अनेक त्रुटी राहून गेल्याने झोडगे गावालगत अनेकांना जीव गमवावा लागला. अनेकांना गंभीर इजा होऊन जायबंदी व्हावे लागले. राष्ट्रीय महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात व रस्ता क्रॉसिंगच्या ठिकाणी गतिरोधक बसविले असल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवले जाते. मात्र, महामार्ग दुरुस्तीच्या वेळी गतिरोधक काढून टाकण्यात आल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसते. काही दिवसांपूर्वी महामार्ग नूतनीकरण, डांबरीकरणावेळी गतिरोधक काढून टाकण्यात आल्याने ग्रामपंचायतीतर्फे महामार्गाची देखरेख करणाऱ्या इरॅकान सोमा कंपनीकडे १८ जानेवारीला गतिरोधक बसविण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. या पत्राला केराची टोपली दाखविल्यानेच आजपर्यंत चार अपघात घडल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. 

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण

राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. मुख्य बाजारपेठ असलेल्या झोडगे गावात परिसरातील खेडेगावातील नागरिकांची मोठी वर्दळ असते. शासकीय कार्यालये, बँक व विविध शैक्षणिक संस्था तसेच कांदा मार्केट असल्याने रस्ता क्रॉसिंग करताना महामार्गावरून येणाऱ्या वाहनांचा वेग लक्षात येत नसल्याने अपघात होतात. यासाठी गतिरोधक बसविण्याची मागणी केली असता गतिरोधक बसविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे परवानगी घेऊन गतिरोधक बसविण्याचे सांगण्यात आले. 
-अशोक बच्छाव, ग्रामविकास अधिकारी, झोडगे  

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman on two-wheeler killed in truck collision nashik marathi news