महापालिका मुख्यालय आग दुर्घटना : ईलेक्ट्रिकल ऑडीट न झाल्याने विद्युत विभाग रडारवर

nashik-nmc_201909294551.jpg
nashik-nmc_201909294551.jpg

नाशिक : महापालिका मुख्यालयातील विरोधी पक्ष नेत्यांच्या कॅबिनला शुक्रवारी (ता. 23) लागलेली आग अग्निशमन विभाग व विद्युत विभागामधील वादाला कारणीभुत ठरताना दिसत आहे. अग्निशमन विभागाने दोन महिन्यांपुर्वी फायर ऑडीट केल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर आता ईलेक्ट्रिकल ऑडीटचा मुद्दासमोर आला असून पालिका ईमारतीचे ईलेक्ट्रिकल ऑडीट झाले नसल्याने हा विभाग आता रडारवर आला आहे. 

अग्निशमन विभाग चौकशीतून सहिसलामत सुटण्याची शक्यता

महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनमध्ये शुक्रवारी (ता. 23) विरोधी पक्षनेत्यांच्या कॅबिनला लागुन असलेल्या स्टोअर रुममधील स्विच बोर्डात शॉर्टसर्कीट झाल्याने आग लागली. सुरुवातीला किरकोळ स्वरुपात असलेली आग प्लायवुड, सोफा सेटमुळे भडकत गेली. अर्धा तासात आग विझविण्यात यश आल्यानंतर घटनेची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. समितीमध्ये शहर अभियंता संजय घुगे, विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांचा समावेश आहे. पालिका ईमारतीचे दोन महिन्यांपुर्वी फायर ऑडीट करण्यात आले आहे. त्यामुळे अग्निशमन विभाग चौकशीतून सहिसलामत सुटण्याची शक्यता आहे. परंतू पालिका ईमारतीचे ईलेक्ट्रिकल ऑडीट झाले नसल्याची बाब समोर आली आहे. 

ईलेक्ट्रिकल ऑडीट गरजेचे 

पालिका मुख्यालयाची ईमारत राज्यातील सुरक्षित ईमारतींपैकी एक आहे. परंतू शासन नियमाप्रमाणे फायर व ईलेक्ट्रिकल ऑडीट वर्षातून एकदा करणे गरजेचे आहे. दोन महिन्यांपुर्वी फायर ऑडीट करण्यात आले. परंतू ईलेक्ट्रिकल ऑडीट अद्यापही झालेले नाही. फायर ऑडीटमध्ये अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत आहे कि नाही हे तपासले जाते. नादुरुस्त असल्यास दुरुस्ती केली जाते. त्याचप्रमाणे ईलेक्ट्रिकल साहित्य जसे वायर, ईलेक्ट्रिकल ट्रान्सफार्मर, फ्युज आदींची तपासणी केली जाते. नादुरुस्त असल्याने ते बदलले जातात. शॉर्ट सर्कीट मुळे आग लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला जात असल्याने विद्युत विभाग आता रडावर येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com