पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न; धक्कादायक घटना 

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 20 January 2021

पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून तिचा खून करून पतीने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मालेगाव (जि.नाशिक) : पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून झालेला वाद विकोपाला गेल्याने पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून तिचा खून करून पतीने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार शहराजवळील सोयगाव शिवारातील वीज उपकेंद्राजवळ तुळजाई कॉलनीत घडला. काय घडले नेमके?

पती-पत्नीचा वाद गेला निकोपाला; डोक्यात कुऱ्हाड घालून पत्नीचा खून 

रूपेश ठाकरे (वय २५, रा. साने गुरुजीनगर, कॅम्प) याला कॅम्प पोलिसांनी जखमी अवस्थेत अटक केली. रूपेश तुळजाई कॉलनी भागात बांधकामावर पहारेकरी व मदतनीस म्हणून काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन होते. चारित्र्याच्या संशावरून तो पत्नी संजना ठाकरे (वय १८) हिच्याशी वारंवार भांडण करत असे. रविवारी (ता. १७) रात्री उशिरा दोघांमध्ये भांडण झाले. यात त्याने तिच्या डोक्यात कुऱ्हाड मारून खून केला.

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क

चारित्र्याच्या संशयावरून भांडण विकोपाला 

पत्नी ठार झाल्याचे पाहिल्यानंतर रूपेशने स्वत:वरही कुऱ्हाडीचे वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मृत संजनाचा भाऊ, सोमनाथ दळवी (वय २०, रा. राणीबाईची वस्ती, एमबी शुगरमागे, नामपूर रोड) याच्या तक्रारीवरून रूपेशविरुद्ध खून, आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of wife nashik marathi crime news