उद्योगमंत्री म्हणताएत...'परस्पर सहकार्याने उद्योगांचे प्रश्‍न सोडवू'

subhassh desai 2.jpg
subhassh desai 2.jpg
Updated on

नाशिक : उद्योग सुरू करण्याची गरज सरकारलाही समजते व म्हणून आम्ही त्या तयारीत आहोत. आजपर्यंत 25 हजारांपर्यंत उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली असून, शिवाय स्वयंचलित दुचाकी वाहनांसाठीचे दहा किलोमीटर बंधन मागे घेतले आहे. उद्योजकांकडून आलेल्या सर्व सूचनांचा विचार केला जाईल आणि उद्योग क्षेत्राला सर्व सहकार्य दिले जाईल, असे आश्‍वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ऍन्ड ऍग्रिकल्चरतर्फे झालेल्या ई-सभेत ते बोलत होते. 

सरकार उद्योगांसाठी करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्री यांनी कोरोना महामारीविरुद्ध लढण्यासाठी सरकारने लागू केलेल्या टाळेबंदीमुळे उद्योग क्षेत्राला व खासकरून लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अशा पार्श्‍वभूमीवर एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन व्यापार व उद्योगांना जाणवणाऱ्या अडचणी, तसेच टाळेबंदी दूर झाल्यावर उद्योग सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी व त्यासाठी करावी लागणारी उपाययोजना याबाबत विचार करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली ई-चर्चासत्र झाले. राज्यातील सर्व विभागांतील विभागीय चेंबर्स आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. चेंबरचे अध्यक्ष मंडलेचा यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन व सर्व प्रतिनिधींचे स्वागत करून सद्यःस्थितीचा आढावा घेताना लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग, तसेच व्यापारी व शेतकऱ्यांना जाणवत असलेल्या अडचणींबाबत तसेच उद्योग सुरू करण्यासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करून महाराष्ट्रातील सर्व उद्योजक सरकारबरोबर आहेत व सरकार देईल त्या मार्गदर्शक तत्त्वांचे उद्योजक पालन करतील, असे त्यांनी सांगितले. 

चर्चेत अडीचशेपेक्षा जास्त उद्योजकांचा सहभाग

चर्चेत श्री. देसाई यांनी उद्योजकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर म्हणाले, की आपली लढाई कोरोनाशी असल्याने त्याचे मुख्य भान ठेवावे लागेल. त्याच वेळी उद्योगचक्रही सुरू करून अर्थव्यवस्थेला चालनाही द्यावी लागेल. हे कार्य परस्पर विश्‍वास, संवाद आणि सहकार्याने करू. उद्योजकांना जाणवणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्प डेक्‍स सुरू करावे, ही महाराष्ट्र चेंबरने केलेली मागणी श्री. देसाई यांनी तत्काळ मान्य केली. चर्चेत अडीचशेपेक्षा जास्त उद्योजक, व्यापारी सहभागी झाले होते. ललित गांधी यांनी आभार मानले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com