esakal | नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य शुक्रवारपासून पर्यटकांसाठी खुले! परदेशी ‘पाहुण्यां‘ना न्याहाळता येणार जवळून  
sakal

बोलून बातमी शोधा

nandur madhmeshwar bird.jpg

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. येत्या शुक्रवारपासून (ता. २०) हे अभयारण्य पर्यटकांसाठी खुले होणार आहे. त्यामुळे थंडीत आगमन होणाऱया देशातील बरोबर परदेशी ‘पाहुण्यां‘ना जवळून न्याहाळण्याचा आनंद लुटता येणार आहे. 

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य शुक्रवारपासून पर्यटकांसाठी खुले! परदेशी ‘पाहुण्यां‘ना न्याहाळता येणार जवळून  

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. येत्या शुक्रवारपासून (ता. २०) हे अभयारण्य पर्यटकांसाठी खुले होणार आहे. त्यामुळे थंडीत आगमन होणाऱया देशातील बरोबर परदेशी ‘पाहुण्यां‘ना जवळून न्याहाळण्याचा आनंद लुटता येणार आहे. 

परदेशी ‘पाहुण्यां‘ना न्याहाळता येणार जवळून 
महाराष्ट्राचे भरतपूर समजले जाणाऱया आणि १९८६ मध्ये अधिसूचित झालेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात किलबिलाट वाढला आहे. खानगावथडी (ता. निफाड) येथील गोदावरी व कादवा या नद्यांच्या संगमावर १९११ मध्ये बंधाऱ्याला दगडी भिंत बांधण्यात आली. या परिसरात तब्बल २३९ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. अभयारण्यात देश-परदेशातील पक्षीमित्र अभ्यास करण्यासाठी हिवाळ्यात भेट देत असतात. पण यंदा हिवाळा सुरु झाला, तरीही पर्यटक आणि पक्षीमित्र अभयारण्यात जाऊ शकत नव्हते. अनेक पक्षीमित्रांनी अभयारण्य खुले करावे अशी मागणी वन विभागाकडे लावून धरली होती. अनेक महिन्यांपासून अभयारण्य बंद असल्याने वन कर्मचारी, गाईड यांना मोबदला मिळाला नाही. आता पर्यटन सुरु होत असल्याने आर्थिक अडचण दूर होणार आहे. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

कोरोना महामारीमुळे बंद असलेले पक्षी अभयारण्य २० नोव्हेंबरपासून पर्यटकांसाठी खुले करण्यास परवानगी मिळाली आहे. पर्यटकाने मास्क लावणे सक्तीचे केले असून रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासले जाणार आहे. सुरक्षित अंतर ठेवून पक्षी निरीक्षण करावे लागणार आहे. -अनिल अंजनकर (मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव) 
 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी 

go to top