esakal | भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले?
sakal

बोलून बातमी शोधा

traffic police.jpg

भरदिवसा, भरचौकात आता पोलिसांनाच संरक्षणाची गरज? वाहतूक नियंत्रित करत असलेल्या वाहतूक पोलिसांशी त्याने हुजत घातली. इथंपर्यंतच न थांबता त्याने थेट  पोलिसाच्या श्रीमुखातच भडकावली....वाचा नेमके काय घडले?

भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले?

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : भरदिवसा, भरचौकात आता पोलिसांनाच संरक्षणाची गरज? वाहतूक नियंत्रित करत असलेल्या वाहतूक पोलिसांशी त्याने हुजत घातली. इथंपर्यंतच न थांबता त्याने थेट  पोलिसाच्या श्रीमुखातच भडकावली....वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

मुंबई - आग्रा महामार्गावरील आडगाव परिसरात सर्व्हिस रोड वरील शनिवारी (ता. २२) अकराच्या सुमारास वाहतूक कोंडी दरम्यान झालेल्या वादात एकाने वाहतूक पोलिसाच्या श्रीमुखात भडकाविली. सुनील सुरेश साळुंखे असे संशयिताचे नाव आहे. शनिवारी सर्व्हिसरोड वाहतूक कोंडी झाली होती. त्यावेळी तेथे वाहतूक शाखेत ड्युटीवर असलेले शिपाई संदीप गिरिधर सोनवणे (वय ४०) व पोलीस हवालदार नवनाथ वाल्मीक रोकडे हे दोघे फळाच्या गाड्यासमोरील वाहतूक कोंडी सुरळीत करीत असतांना सुनील साळूंखे याने विनाकारण वाद करीत, शिपाई संदीप सोनवणे यांच्या श्रीमुखात भडकाविली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा > शिवप्रेमींत हळहळ; शिवप्रेमी रितेशची किल्ल्यावरील 'ती' सेल्फी शेवटची ठरली, काय घडले?

हेही वाचा > अचानक सायरनचा तो धडकी भरविणारा आवाज..नागरिकांत घबराट अन् सुटकेचा निश्वास! काय घडले नेमके?

go to top