‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ७२ टक्के लोकांचे सर्वेक्षण

my family.jpg
my family.jpg

नाशिक : जिल्ह्यातील ४३ लाख सात हजार ७२७ लोकसंख्येपैकी ३० लाख ८२ हजार ७६१ म्हणजेच, ७१.५६ टक्के जणांचे सर्वेक्षण ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी‘ मोहिमेंतर्गत पूर्ण झाले आहे. एक हजार ९४३ पथकांना नऊ हजार ४९८ जणांना आरोग्यविषयक प्रश्‍न भेडसावत असल्याचे आढळले. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९५ पेक्षा कमी असलेले एक हजार २३८ जण आढळले असून, दोन हजार ५२६ जण कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आले. 

पाच हजार जणांना केले संदर्भ 

ताप- खोकला- थंडीची त्रास जाणवणारे एक हजार ५८६, थंडी- खोकल्याचा त्रास असणारे पाच हजार ९७६ आणि ताप असलेले एक हजार ६६६ जण आढळले आहेत. फिव्हर क्लिनिकडे उपचारासाठी पाच हजार ६१ जणांना संदर्भित करण्यात आले आहे. आठ लाख ५६ हजार ४९६ कुटुंबांपैकी सहा लाख ४५ हजार ८७१ घरांचे सर्वेक्षण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. तालुकानिहाय रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९५ पेक्षा कमी आढळलेल्यांची आणि फिव्हर क्लिनिकला संदर्भित केलेल्यांची संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे असून 

(कंसात कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आढळलेल्यांची संख्या दर्शवते)  

बागलाण-९६-३३८ (१७१), चांदवड-८८ -६६४ (२४५), 
देवळा-५-२६० (१२४), दिंडोरी-७९-३५६ (१५०), 
इगतपुरी-१४०-७५ (४६), कळवण-१६४-११५ (१४०), 
मालेगाव-७३-४३६ (१४६), नांदगाव-६१-७० (६६), 
नाशिक-१७४-६०२ (५६०), निफाड-८८-५४७ (३२३), 
पेठ-१०-४५६ (३४), सिन्नर-१३६-४४५ (३६७), 
सुरगाणा-८९-४१ (२३), त्र्यंबकेश्‍वर-५-१७१ (५३), येवला-३०-४८५ (७८). 

२० टक्के माहिती ॲपमध्ये 

मोहिमेंतर्गत सर्वेक्षण झालेल्या लोकांपैकी २० टक्के म्हणजेच, सहा लाख १३ हजार ६३६ जणांची माहिती ॲपमध्ये भरण्यात आली आहे. सर्वेक्षण करणाऱ्या पथकांची आणि आतापर्यंत सर्वेक्षण झालेली लोकसंख्या पुढीलप्रमाणे असून, (कंसात तालुक्याची लोकसंख्या दर्शवते) : बागलाण- १९१-३,४७,३२५ (३,७२,७३१), चांदवड-१५१-२,२५,९७४ (२,४२,९६६), देवळा-८७-१,१९,२९० (१,४३,५८८), दिंडोरी-११०-१,६९,७६४ (३,१८,५७७), इगतपुरी-२२९-१,९९,१२३ (२,८०,५६६), कळवण-१०४-१,८५,३५९ (२,१६,२१२), मालेगाव-१६८-३,०८,३८० (४,०२,७३०), नांदगाव-१३४-१,९५,१६८ (३,०७,४४६), नाशिक-१३५-२,२२,०९४ (२,९५,०६४), निफाड-२००-३,०४,९४७ (५,४६,७५५), पेठ-७३-१,०२,८०८ (१,३५,५५६), सिन्नर-१५२-२,४१,४८९ (३,७४,४२९), सुरगाणा-५९-१,३५,५४९ (२,००,०१२), त्र्यंबकेश्‍वर-६६-१,४१,९५२ (१,८०,४३१), येवला-८४-१,८३,५३९ (२,९०,६६४). 

सर्वेक्षणात आढळलेल्या रुग्णांची संख्या 
तालुका थंडी-ताप-खोकला थंडी-खोकला ताप 

बागलाण १६७ ७९३ ० 
चांदवड ९६ ४८० ० 
देवळा ८६ १२५ १४ 
दिंडोरी २५ २४६ ६ 
इगतपुरी २० ५४३ ९२ 
कळवण ३१० ५३७ १७९ 
मालेगाव १०६ ४६७ ३१६ 
नांदगाव ८४ ३०२ ११५ 
नाशिक २७६ ५१४ ४८१ 
निफाड १०७ २४५ १०७ 
पेठ १० ४१८ २८ 
सिन्नर ८१ ६८९ ३०८ 
सुरगाणा १४ २३० ३ 
त्र्यंबकेश्‍वर ४४ १८१ १५ 
येवला १६० २०६ २  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com