'लॉकडाउनमध्ये सिलेंडर संपलंय?'...काळजी नको, कारण...

gas cylinder.jpg
gas cylinder.jpg

नाशिक : नाशिककरांना एलपीजी रिफीलसाठी घराबाहेर पडण्याची गरज नाही. 7588888824 या क्रमांकावर एसएमएस अथवा आयवीआरएस अथवा व्हॉट्‌सऍप करून मागणी नोंदविता येईल. तसेच इंडियन ऑइल ऍप अथवा cx.indianoil.in अथवा @Paytm वरून बुक करू शकता. 

वितरण पुन्हा सुव्यवस्थित केलं जातंय

सध्या प्रमुख पेट्रोलियम उत्पादनांची मागणी कमी असतांना एलपीजी स्वयंपाकाच्या गॅसची मागणी वाढली आहे. एलपीजीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी इंडियन ऑइल आपल्या प्रमुख रिफायनरीजमध्ये एलपीजीचे उत्पादन वाढविण्यासाठी पावले उचलत आहे. एलपीजी उत्पन्न करणारे युनिट्‌स एफसीसी- इंडमॅक्‍स आदींचे एलपीजी अधिक उत्पादन करणे, बॉटलिंग प्लांट ऑपरेशन्स आणि एलपीजी रिफील वितरण पुन्हा सुव्यवस्थित केले जात आहे. 

भौगोलिक क्षेत्रातील आवश्‍यक सेवा चालू

एलपीजी ग्राहकांसाठी आपत्कालीन 1906 सेवा क्रमांक नेहमीप्रमाणे कार्यरत आहे. पुरेसा साठा उपलब्ध असून, ग्राहकांना बुकिंगची गरज भासणार नाही. राज्य सरकार, स्थानिक प्रशासनाच्या सल्ल्यानुसार भौगोलिक क्षेत्रातील आवश्‍यक सेवा चालू ठेवायच्या आहेत. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com