कळसुबाई शिखरावरील नवरात्रोत्सव भाविकांविना; कोरोनामुळे ग्रामपंचायत, ट्रस्टकडून बंदी 

गौरव परदेसी
Friday, 16 October 2020

कोरोनामुळे यंदा भाविकांना कळसुबाई निवासिनी ट्रस्ट व बारी ग्रामपंचायतीकडून कडक बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांसह गिर्यारोहकांचा हिरमोड झाला आहे. 

नाशिक/खेडभैरव : कोरोनामुळे यंदा भाविकांना कळसुबाई निवासिनी ट्रस्ट व बारी ग्रामपंचायतीकडून कडक बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांसह गिर्यारोहकांचा हिरमोड झाला आहे. 

नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई

महाराष्ट्रातील सर्वांत उंच कळसुबाई शिखरावर दर वर्षी नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी उसळते. मुंबई, ठाणे, नाशिक, तसेच स्थानिक भाविक, गिर्यारोहक दर वर्षी नवरात्रोत्सवात हजेरी लावतात. दर वर्षी एक लाखाहून अधिक भाविक नवरात्रोत्सवात शिखरावर येत असतात. मात्र, कोरोनामुळे या वर्षी कळसुबाई निवासिनी ट्रस्ट व बारी ग्रामपंचायतीने बंदचे परिपत्रक काढून परिसरात याबाबत सूचनेचे फलकही लावले आहेत. येथील आदिवासी बांधवांनी मंदिर परिसरात स्वच्छता करून वारली संस्कृतीचे चित्र रेखाटून रंगरंगोटी केली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. 

हेही वाचा >"कलेक्टरसाहेब, शहर-जिल्ह्यातील अवैध धंदे थांबवा!" पोलिस आयुक्तांचे तिन्ही विभागांना पत्र

आजपर्यंत परिसरातील सर्व नागरिक कोरोना महामारीपासून सुरक्षित आहेत. गाव, नागरिक सुरक्षित राहण्यासाठी कोरोनासारख्या रोगाचा परिसरात शिरकाव होऊ नये म्हणून या वर्षी नवरात्री उत्सवात भाविकांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. 
-तुकाराम खाडे, उपाध्यक्ष, कळसुबाई देवस्थान ट्रस्ट  

 हेही वाचा > दुर्दैवी! अस्मानी संकट, निसर्गाचा कहर आणि शेतकऱ्याचा जागीच मृत्यू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri festival on Kalsubai peak without devotees nashik marathi news