नवरात्रोत्सव व्यक्तिगत साजरा करावा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

विनोद बेदरकर
Friday, 16 October 2020

भाविकांनी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. यंदाचा नवरात्रोत्सव आपण जर सार्वजनिक स्वरूपात न ठेवता व्यक्तिगत स्वरूपात ठेवला तर त्यामुळे कोरोना संसर्गाला आळा घालण्यास नक्कीच मदत होईल, असेही आवाहन केले.

नाशिक : कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी कधी उद्रेक होईल, हे सांगता येणे कठीण आहे. त्यामुळे यंदा यात्रोत्सवासह कावडीला प्रतिबंध केला आहे. त्याऐवजी नवरात्रोत्सव व्यक्तिगत स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. 

तर कोरोनाला आळा घालण्यास नक्कीच मदत

जिल्हाधिकारी म्हणाले, की कोरोना संसर्गामुळे नवरात्रोत्सवात सप्तशृंगीदेवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. गडावर कावडी, ज्योत घेऊन जाणारे भाविक यांना या वर्षी गडावर येण्यास मनाई आहे. कावडीधारक निघाले असतील तर जिथे असाल तिथून त्यांनी मागे फिरावे आणि गावी, घरी जाऊन देवकार्य करावे. गडावरील स्थानिक नागरिकांना पास दिले जाणार आहे; मात्र पासचा गैरवापर केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा > दुर्दैवी! अस्मानी संकट, निसर्गाचा कहर आणि शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

स्थानिक तहसीलदार आणि पोलिसप्रमुख यांना घटनाप्रमुख म्हणून नेमण्यात आलेले आहे. भाविकांनी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. यंदाचा नवरात्रोत्सव आपण जर सार्वजनिक स्वरूपात न ठेवता व्यक्तिगत स्वरूपात ठेवला तर त्यामुळे कोरोना संसर्गाला आळा घालण्यास नक्कीच मदत होईल, असेही आवाहन केले.  

हेही वाचा > "कलेक्टरसाहेब, शहर-जिल्ह्यातील अवैध धंदे थांबवा!" पोलिस आयुक्तांचे तिन्ही विभागांना पत्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri should be celebrated individually, Collectors appeal nashik marathi news