esakal | राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे अडकल्या लग्न बंधनात; सोहळ्यास शरद पवारांची उपस्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

NCP MLA Saroj Ahire got married in Nashik

 देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे व नाशिक मधील दंतरोगतज्ञ डॉ.प्रवीण वाघ यांच्या विवाह मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत झाला. 

राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे अडकल्या लग्न बंधनात; सोहळ्यास शरद पवारांची उपस्थिती

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे व नाशिक मधील दंतरोगतज्ञ डॉ.प्रवीण वाघ यांच्या विवाह मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत झाला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, पालकमंत्री छगन भुजबळ आदीनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत झालेल्या विवाहासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार दिलीप बनकर,आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, आमदार ॲड माणिक कोकाटे, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड आदीसह राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रमुख पदाधिकारी असे विविध राजकीय नेते उपस्थित होते.  

दरम्यान त्यांच्या विवाहासाठी पत्रकारांना प्रवेश देण्याच आला नव्हता. त्यामुळे ऐनवेळी श्रीमती आहिरे यांनी बोलावूनही पत्रकारांनी प्रवेशद्वारावर शुभेच्छा स्विकारत त्यांची विवाहाला उपस्थिती टाळली.

 हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ