पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या दुर्लक्षामुळे नागरीकांची आर्थिक लुट...मनसेचा आरोप

Bhujbal.jpg
Bhujbal.jpg

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारी रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक नाही. त्यामुळे नागरिक खासगी रुग्णालयांकडे वळले परंतू येथे मोठ्या प्रमाणात नागरीकांची आर्थिक लुट सुरु असताना पालकमंत्री छगन भुजबळ यांचे लक्ष नसल्याचा आरोप करताना मनसेने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात राज्य शासनासह महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप केला. लोकांची होणारी लुट व कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण न आणल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा ईशारा आज देण्यात आला. त्याचबरोबर शहरात आठ दिवसांसाठी पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्याची मागणी करण्यात आली.

वीस टक्के बेड कुठे गेले ​
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतं असल्याने त्या पार्श्वभूमीवर मनसेने आज आक्रमक भुमिका घेतली. पक्षाचे  प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, अनंता सूर्यवंशी, शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी मनसे कार्यालयात संयुक्त पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पालकमंत्री भुजबळ यांच्यासह महापालिका व जिल्हा प्रशासनावर निशाणा साधला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महापालिका व जिल्हा प्रशासन अपयशी ठरले. सरकारी रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक नसल्याचे कारण दिले जाते परंतू प्रत्येक रुग्णालयात कोरोना बाधितांसाठी राखिव ठेवण्यात आलेले वीस टक्के बेड कुठे गेले असा सवाल दातीर यांनी केला.

खासगी रुग्णालयांवर प्नशासनाचा अंकुश नाही - दातीर

सरकारी रुग्णालयात बेड नाही. त्यामुळे भितीने लोक खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. परंतू तेथे रुग्णालयांनी दुकानदारी सुरु केली असून लाखो रुपयांचे देयके रुग्णांच्या नातेवाईकांकडून वसुल केली जात आहेत. खासगी रुग्णालयांवर  प्नशासनाचा अंकुश नाही. पालकमंत्री भुजबळ यांनी लक्ष घातल्यास रुग्णालयांवर वचक निर्माण होवू शकतो. परंतू ते गप्प का असा सवाल दातीर यांनी केला.  महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार असल्याचे सांगितले जाते. परंतू प्रत्यक्षात लुट होत आहे. पालिका आयुक्तांनी लुट थांबविण्यासाठी लेखा परिक्षकांची नियुक्ती करण्याची केलेली घोषणा कितपत यशस्वी झाली याबाबत दातीर यांनी संशय व्यक्त केला.

कडक लॉकडाऊनची गरज
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक लॉकडाऊनची आवशक्यता अाहे. परंतू लॉकडाऊन करताना गरिबांचा विचार व्हायला हवा असे श्री. मुर्तडक यांनी मागणी केली. कोरोना प्रतिबंधक औषधांचा काळाबाजार शासनाने रोखावा, काळा बाजार करणार्यांवर कडक कारवाई करावी, शासकीय दर खासगी रुग्णालयांसाठी बंधनकारक करावे, शासन नियमांचे पालन होत नसेल तर खासगी रुग्णालयांवर गुन्हे दाखल करावे, कोरोना तपासणीचे चुकीची रिपोर्ट देणार्या खासगी लॅबवर कारवाई करावी, होम क्वारंटाईन लोकांना औषधी किट पुरवावे,आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com