झंवर प्रकरणी नवे वळण! चौकशीसाठी यंत्रणा नाशिकला; फार्महाउस कंपन्या रडारवर 

सतीश निकुंभ
Saturday, 5 December 2020

जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह सोसायटीच्या आर्थिक घोटाळ्याचे संशयित सुनील झंवर यांचे नाशिकमध्ये बोरा व धान्य व्यापारी असे दुहेरी कनेक्शन असल्याने सातपूर, अंबडमधील कंपन्यांच्या कागदपत्र गहाळ प्रकरणांशी झंवर यांचे नाव जोडले जात आहे. 

सातपूर (जि.नाशिक) : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह सोसायटीच्या आर्थिक घोटाळ्याचे संशयित सुनील झंवर यांचे नाशिकमध्ये बोरा व धान्य व्यापारी असे दुहेरी कनेक्शन असल्याने सातपूर, अंबडमधील कंपन्यांच्या कागदपत्र गहाळ प्रकरणांशी झंवर यांचे नाव जोडले जात आहे. 

झंवर यांच्या चौकशीसाठी यंत्रणा नाशिकला 
झंवर यांच्याशी संबंध नसल्याचे दाखविण्यासाठी सातपूर-अंबडमधील अचानक काही कंपन्यांची मूळ खरेदी कागदपत्रे चोरी झाल्याच्या तक्रारी वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळे कंपन्यांचे खरेदी कागदपत्र गहाळ प्रकरणातील गौडबंगाल शोधून त्याचे कनेक्शन तपासले जावे, अशी मागणी सातपूर-अंबड औद्योगिक परिसरात सुरू आहे. 

कंपनी कागदपत्र गहाळ प्रकरणाशी झंवर कनेक्शन? 
संशयित झंवरचे नाशिक-त्र्यंबकेश्‍वर येथील भूखंडाचे व्यवहार, कंपन्यांच्या खरेदी प्रकरणातील गहाळ कागदपत्र प्रकरण अशा नानाविध प्रकरणांशी नाव जोडले जात आहे. पुणे आणि जळगाव पोलिस त्याच शोध घेत आहेत. जळगाव येथील सुनील झंवर याच्यासह अन्य काही व्यावसायिकांना बीएचआर सोसायटी प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने रडारवर घेतले आहे. अवसायकास हाताशी धरून गैरप्रकार केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी चौघांना अटक झाली असून, सहा जण फरारी आहेत. झंवर व त्यांचे भागीदार बोरा तसेच पक्षाच्या काही व्यक्तींची चौकशी अपेक्षित आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

फार्महाउस कंपन्या रडारवर 
चौकशी प्रकरणात कंपन्यांसोबत इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्‍वर, गंगापूर, दरी, मातोरी भागातील फार्महाउसचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new twist in the Zanwar case nashik marathi news