esakal | Marathi Sahitya Sammelan : सारस्वतांसह अन्य घटकांमध्ये कोरोनाची धास्ती; आयोजनाबद्दल चौकशीचा तगादा सुरु

बोलून बातमी शोधा

marathi sahitya sammelan nashik.jpg}

आठ दिवसांत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिकमधील नियोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाबाबत सारस्वतांसह संमेलनाशी निगडित अन्य घटकांमध्येही धास्ती वाढली आहे.

Marathi Sahitya Sammelan : सारस्वतांसह अन्य घटकांमध्ये कोरोनाची धास्ती; आयोजनाबद्दल चौकशीचा तगादा सुरु
sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : आठ दिवसांत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिकमधील नियोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाबाबत सारस्वतांसह संमेलनाशी निगडित अन्य घटकांमध्येही धास्ती वाढली आहे. परिणामी, संमेलनाच्या मध्यवर्ती कार्यालयात फोन, प्रत्यक्ष भेट घेत संमेलन होणार की नाही, याबाबत चौकशीचा तगादा लावला जात आहे. 

संयोजक संमेलनासाठी सकारात्मक

संमेलनाचे नियोजन दीड महिन्यापासून चोख सुरू असून, यासाठी विविध समित्यांच्या माध्यमातून संमेलनाच्या कामांना गती दिली जात आहे. काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने काही समित्यांचे कामकाजही ऑनलाइन स्वरूपात सुरू आहे. संमेलन कार्यालयातही कोविडचे नियम पाळले जात आहेत. आठ दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असला तरी, संमेलनाला आणखी महिना शिल्लक असल्यामुळे संयोजक संमेलनासाठी सकारात्मक असल्याचे चित्र आहे. संमेलन नियोजित तारखांप्रमाणेच होणार आहे. पण, कोरोनामुळे साहित्य महामंडळ, महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेते, याचीही धास्ती संयोजकांना वाटत आहे. त्यातच, लॉकडाउन पुन्हा लागेल अशी चर्चा आहे. त्यामुळे संमेलनाच्या मध्यवर्ती कार्यालयात संमेलन होणार की नाही, याबाबत विचारणा करणारेच फोन येत असल्याचे काही दिवसांपासून चित्र आहे. तर संमेलनातील इतर घटकांनीही संमेलन कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन संयोजकांना विचारणा केली आहे. 
 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना