esakal | ‘पीएम किसान’ योजनेच्या कामास तलाठ्यांचा नकार; कामे कृषी विभागाकडून करून घेण्याची मागणी 

बोलून बातमी शोधा

News about pm kisan scheme works Nashik Marathi News}

पंतप्रधान किसान सन्मान योजनेशी संबंधित कामे करण्यास तलाठ्यांनी नकार दिला आहे

nashik
‘पीएम किसान’ योजनेच्या कामास तलाठ्यांचा नकार; कामे कृषी विभागाकडून करून घेण्याची मागणी 
sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान योजनेशी संबंधित कामे करण्यास तलाठ्यांनी नकार दिला आहे. याबाबत तलाठी यापुढे ‘पीएम-किसान’चे काम करणार नसून हे काम कृषी विभागामार्फत करून घ्यावे, अशा मागणीचे निवेदन नाशिक जिल्हा तलाठी संघाने निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना दिले. 

राज्य तलाठी संघाच्या कार्यकारिणीच्या पुण्यात झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ‘पीएम किसान’च्या विषयाला अनुसरून होणाऱ्या त्रासाबाबत माहिती देत योजनेचे कामकाज नाकारण्याबाबत मत व्यक्त केले होते. सद्यःस्थितीत तलाठी, मंडळ अधिकारी यांना महसूल विभागाशी निगडित मूळ महसुली कामकाज करावे लागते. ज्यामध्ये निवडणुका, संजय गांधी योजनेचे लाभार्थी शोधणे, वसुली अशी अनेक कामे करावी लागत आहेत. यासह सातबारा संगणकीकरण, ई-चावडी योजना अंतिम टप्प्यात आहे. यांसह नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना अनुदानवाटप यासारखी कामेही करावी लागत आहेत. त्यामुळे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर इतर कामकाजाशी निगडित असलेल्या अतिरिक्त कामाकाजाचा बोजा पडत आहे. त्यामुळे महसुली व बिगरमहसुली कामे पाहता योजनेचे काम नियोजित वेळेत करण्यास विलंब होत असून, त्याची जबाबदारी तलाठ्यांवर टाकण्यात आली आहे. हे अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

त्यामुळे या योजनेकडे पूर्ण क्षमतेने योजनेच्या अनुषंगाने कामकाजाकडे पूर्ण क्षमतेने लक्ष देणे शक्य होणार नाही. त्यामुळे यापुढे तलाठी व मंडळाधिकाऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचे काम देऊ नये, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस बाबासाहेब खेडकर, कार्याध्यक्ष एम. एल. पवार, अध्यक्ष नीळकंठ उगले यांसह संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.  

हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा