esakal | बागलाण तालुक्यात रुग्णांची हेळसांड; आरोग्य केंद्रे शोभेचे बाहुले  
sakal

बोलून बातमी शोधा

sakal (11).jpg

बागलाण तालुक्यातील आरोग्य केंद्रात अनेक रिक्त पदे असून, ग्रामीण रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या सलाइनवर आहेत

बागलाण तालुक्यात रुग्णांची हेळसांड; आरोग्य केंद्रे शोभेचे बाहुले  

sakal_logo
By
दीपक खैरनार

अंबासन (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील आरोग्य केंद्रात अनेक रिक्त पदे असून, ग्रामीण रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या सलाइनवर आहेत. जवळपास ५५ रिक्त पदांमुळे रुग्णांची गैरसोय होत असून, प्रशासनाने याकडे लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

आरोग्य कर्मचाऱ्यांची ५५ पदे रिक्त; आरोग्य केंद्रे शोभेचे बाहुले 

तालुक्यातील सटाणा, डांगसौंदाणे व नामपूर या तीन मोठ्या गावात प्रशस्त रुग्णालये उभारण्यात आली आहेत. ग्रामीण भागात ११ प्राथमिक केंद्रे व ५२ उपकेंद्रे आहेत. तालुक्यातील आरोग्य विभागात बहुतांश ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अनेक पद रिक्त असल्याने स्थानिक पातळीवरील रुग्णांची हेळसांड होत आहे. तालुक्यातील एका सुसज्ज मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळंतपणासाठी रुग्णवाहिकेतून महिलेला आणले असता, तेथे एकही वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेविका नसल्याने संबंधित महिलेला पुन्हा दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आल्याची घटना रुग्णवाहिका चालकाने सांगितली.

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय

कपालेश्वर येथेही काही दिवसांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय होत असल्याने प्रहार संघटनेने आंदोलन छेडले होते. प्रशासनाने शहरी भागासह ग्रामीण भागात नागरिकांच्या आरोग्यासाठी लाखो रुपये खर्च करून आरोग्य केंद्र उभारण्यात आली आहेत. मात्र रिक्त पदांमुळे शोभेचे बाहुले बनल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोग्य विभागाने दखल घेऊन तातडीने रिक्त पद भरावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

शासनाने मोठ्या इमारती रुग्णालयासाठी बांधली आहेत. ग्रामीण भागात त्याचा उपयोग होत नाही. रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या जवळजवळ नाहीच, असे म्हणावे लागेल. कोरोनासाठी खासगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा पैसे द्यावे लागतात. त्यामुळे तीही सेवा उपलब्ध करून द्यावी. -शशिकांत कोर, ग्रामपंचायत सदस्य, अंबासन 

वैद्यकीय अधिकारी कंत्राटी स्वरूपात असून, पाच पदे रिक्त आहेत. आरोग्यसेविकांची पदे रिक्त आहेत. पदे भरण्यासाठी शासनाच्या सूचना आल्यावरच पुढील प्रक्रिया होईल. कोविड सेंटरचे आता फक्त फिव्हर क्लिनिक चालू असल्याने तेथेही वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता कोणीही दिलेले नाही. -हेमंत आहिरराव, तालुका वैद्यकीय अधिकारी, बागलाण 

आरोग्य विभागातील रिक्त पदे ः 
पदे मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे 

१) वैद्यकीय अधिकारी : (स्थायी) २२ १० १२ 
२) आरोग्यसेवक (परुष) : ५३ ४३ १० 
३) आरोग्य सहाय्यक (पुरुष) : २२ २१ ०१ 
४) आरोग्यसेविका (महिला) : ६३ ४७ १६ 
५) आरोग्यसेविका : १७ १३ ०४ 
६) स्टाफ नर्स : ०३ ०३ ०० 
७) आरोग्य सहाय्यक (महिला) : ११ ०५ ०६ 
८) औषधनिर्माता अधिकारी : ११ १० ०१ 
९) प्रयोगशाळा तंत्रज्ञ : ११ १० ०१ 
१०) कनिष्ठ सहाय्यक : ११ ०९ ०२ 
११) परिचर : ४४ ३० १४ 
१२) वाहनचालक (कंत्राटी) : ११ ११ ०० 

एकूण : २५७ २०२ ५५