पोलिसांनो काळजी घ्या! उत्तर महाराष्ट्रात १३२४ पोलिसांना कोरोना; आतापर्यंत २२ जणांचा बळी

विनोद बेदरकर
Sunday, 27 September 2020

शहर पोलिसांसह नाशिक विभागातील २२ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, मृत्यूच्या प्रमाणात नाशिक ग्रामीणने सुरवातीस घेतलेली आघाडी अद्याप कायम आहे. यानंतर नाशिक शहर पोलिस दलाचा क्रमांक लागतो. शहर पोलिस दलातील पाच कर्मचारी शहीद झाले आहेत. 

नाशिक : शहरासह विभागातील पाच जिल्ह्यांत एक हजार ३२४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण जळगावात असून, त्यापाठोपाठ नाशिक शहराचा क्रमांक लागतो. विभागात कोरोनाने २२ पोलिसांचा बळी घेतला असून, आजमितीस २१२ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.

जळगाव जिल्ह्यात बाधितांची संख्या अधिक 

नाशिक विभागात कोरोनाचा सर्वाधिक फटका जळगाव पोलिस दलाला बसला आहे. त्याखालोखाल नाशिक ग्रामीण, नगर आणि नाशिक शहर पोलिसांचा क्रमांक लागतो. सध्या नाशिक शहरात कोरोनाचा प्रसार जोमाने सुरू असून, त्याचा फटका शहर पोलिसांना बसत असल्याचे वास्तव आहे. आजमितीस नाशिक शहर पोलिस दलातील ७२ पोलिस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. शहर पोलिसांसह नाशिक विभागातील २२ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, मृत्यूच्या प्रमाणात नाशिक ग्रामीणने सुरवातीस घेतलेली आघाडी अद्याप कायम आहे. यानंतर नाशिक शहर पोलिस दलाचा क्रमांक लागतो. शहर पोलिस दलातील पाच कर्मचारी शहीद झाले आहेत. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

जिल्हा- कोरोनाबाधित उपचार सुरू- मृत्यू

नगर- २९१- ३२- ४ 
जळगाव- ३५६- ४९- ४ 
नाशिक ग्रामीण-२९१- ३०- ६ 
नाशिक शहर- २७२- ७२- ५ 
धुळे- ६०- १२- २ 
नंदुरबार- ५४- १७- १ 
एकूण- १३२४- २१२- २२

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

 संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In North Maharashtra, 1,324 policemen were infected with corona nashik marathi news