esakal | अ‍ॅक्टीव्ह रूग्णसंख्येत जिल्ह्यात 15 ने वाढ; आढळले 257 कोरोना बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus_careless_.jpg

सहा मृतांमध्ये नाशिक शहरातील चार तर नाशिक ग्रामीणमधील दोन रूग्णांचा समावेश आहे. शहरातील सिडको भागातील 65 वर्षीय पुरूष, जेलरोड येथील 42 वर्षीय पुरूष, नाशिकरोड भागातील 80 वर्षीय महिला आणि हिरावाडीतील 57 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

अ‍ॅक्टीव्ह रूग्णसंख्येत जिल्ह्यात 15 ने वाढ; आढळले 257 कोरोना बाधित

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण अधिक राहिल्याने ऍक्‍टीव्ह रूग्णांमध्ये घट होत होती. परंतु गुरूवारी (ता.19) बाधितांची संख्या अधिक राहिल्याने ऍक्‍टीव्ह रूग्णांमध्ये किरकोळ वाढ झाली. दिवसभरात 257 बाधित आढळले असतांना,236 रूग्णांनी कोरोनावर मात केली. तर सहा रूग्णांचा मृत्यू झाला. यातून ऍक्‍टीव्ह रूग्ण संख्येत पंधराने वाढ झाली असून, सद्य स्थितीत जिल्ह्यात 2 हजार 423 बाधित उपचार घेत आहेत.

दिवसभरात आढळले 257 बाधित

गुरूवारी जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील 166, नाशिक ग्रामीणमधील 83, मालेगाव महापालिका हद्दीतील दोन तर जिल्हाबाहेरील सहा रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर कोरोनामुक्‍त झालेल्या रूग्णांमध्ये नाशिक शहरातील 205, नाशिक ग्रामीणमधील 29 तर जिल्हाबाहेरील दोन रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सहा मृतांमध्ये नाशिक शहरातील चार तर नाशिक ग्रामीणमधील दोन रूग्णांचा समावेश आहे. शहरातील सिडको भागातील 65 वर्षीय पुरूष, जेलरोड येथील 42 वर्षीय पुरूष, नाशिकरोड भागातील 80 वर्षीय महिला आणि हिरावाडीतील 57 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 236 रूग्ण कोरोनामुक्‍त

नाशिक ग्रामीणमध्ये दिंडोरीतील 38 वर्षीय पुरूष आणि चांदवड तालुक्‍यातील 82 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 97 हजार 776 झाली असून, यापैकी 93 हजार 606 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 हजार 747 रूग्णांचा जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात नाशिक महपालिका रूग्णालये व गृहविलगीकरणात 1 हजार 097, नाशिक ग्रामीण रूग्णालये व गृहविलगीकरणात 75, मालेगावला दोन, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात सात, जिल्हा रूग्णालयात तीन रूग्ण दाखल झाले आहेत.

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

प्रलंबित अहवालांचा आकडा पंचवीसशे पार

प्रलंबित अहवालांच्या प्रमाणात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गुरूवारी सायंकाळी उशीरापर्यंत 2 हजार 524 अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीण भागातील 1 हजार 756 अहवाल नाशिक ग्रामीण भागातील आहेत. नाशिक शहरातील 658 अहवाल प्रलंबित असून मालेगावच्या 110 रूग्णांना अहवालाची प्रतिक्षा होती.

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान