Coronaupdate : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरुच...कोरोनाबाधितांचा आकडा नऊ हजार ७५ वर

corona testing lab.png
corona testing lab.png

नाशिक : नाशिक शहर-जिल्ह्यात शनिवारी (ता. १८) दिवसभरात १२ जणांचे मृत्यू झाले असून त्यात शहरातील आठ मृत्यू आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा ३८३ झाला आहे. नव्याने दाखल झालेल्या रुग्णांत शहरातील १९२ बाधितांसह जिल्ह्यात एकूण ३३६ नवीन कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील शनिवारी कोरोनाबाधितांचा आकडा तब्‍बल नऊ हजार ७५ इतका झाला आहे. 

दिवसभरात १२ मृत्‍यू; तर ३३६ नवीन नवे बाधित

शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या बारा मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील आठ, मालेगाव येथील दोन, नाशिक ग्रामीण एक, तर जिल्‍हा बाह्य एका रुग्‍णाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. नाशिक शहरात ५९ वर्षीय पुरुष, पंचवटीतील ६८ वर्षीय पुरुष, उंटवाडी परीसरातील ६७ वर्षीय महिला, विखे पाटीलनगर येथील ४५ वर्षीय पुरुष, देवळालीगाव परिसरातील ४५ वर्षीय पुरुष, म्हसरूळ येथील ६३ वर्षीय पुरुष, लोखंडे मळा परिसरातील ५७ वर्षीय महिला, पाथर्डी फाटा येथील ३४ वर्षीय पुरुष, तर मालेगाव येथील द्याने येथील ६६ वर्षीय महिला, संगमेश्‍वर येथील ६० वर्षीय पुरुष, मुखेड (ता. येवला) येथील ५० वर्षीय महिलेसह मुंबईच्‍या ७० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. 

वाढत्या चिंतेत थोडा दिलासाही... 

जिल्ह्यात शनिवारी १२ मृत्यू आणि तीन दिवसांत दिवसभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजार २२४ ने वाढली. त्यात ३३६ जण नवे रुग्ण दाखल झाले. नवीन कोरोधाबाधितांची वाढती संख्या चिंता वाढवत असताना कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा आज दिलासादायक होता. शनिवारी तब्बल ३१२ जण बरे झाले. दाखल झालेले नवे रुग्ण आणि बरे झालेले हे दोन्ही आकडे आज समान दिशेने आल्याने तीन- चार महिन्यांपासून कोरोनाशी लढणाऱ्या वैद्यकीय योध्याच्या प्रयत्नाला दिलासा देणारी आहे. 

तीन दिवसांत कोरोनाबाधितांच्‍या संख्येत एक हजारने भर

तीन दिवसांत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्‍या संख्येत एक हजारने भर पडली आहे. ३३६ नवीन रुग्ण आढळून आले. यात शहरातील १९२, नाशिक ग्रामीणचे १३६, तर मालेगाव महापालिका हद्दीतील आठ रुग्‍णांचा समावेश आहे. दिवसभरात दाखल झालेल्‍या एक हजार २२४ संशयित रुग्णांमध्ये नाशिक शहरातील ७६७ रुग्‍ण असून, नाशिक ग्रामीणचे ३५४, मालेगाव महापालिका हद्दीतील ३५४ तर गृह विलगीकरणातील ८५ रुग्‍णांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com