नाशिक शहराची रुग्णसंख्या पन्नास हजार पार; मालेगाववासीयांना मात्र दिलासा 

corona patients.png
corona patients.png

नाशिक : शहरात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांच्‍या एकूण संख्येने सोमवारी (ता. २८) पन्नास हजारांचा टप्पा ओलांडला. जिल्ह्यात आढळलेल्‍या एकूण ७३ हजार ८८८ बाधितांपैकी ५० हजार १८६ बाधित नाशिक शहरातील आहेत. आतापर्यंत बरे झालेल्‍या ६४ हजार ९८१ रुग्‍णांपैकी नाशिक शहरातील ४६ हजार ९४ बाधित आहेत. गेल्‍या ३१ ऑगस्‍टला शहरातील रुग्‍णसंख्या पंचवीस हजारांवर पोचली होती. शहरातील कोरोनाबाधित रुग्‍ण दुप्पट होण्याचे प्रमाण अर्थात, डबलिंग रेट २८ दिवसांचा झाला आहे. दरम्‍यान, दिवसभरात एक हजार ५७ कोरोनाबाधित आढळून आले. ५०१ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले असून, २२ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. 

शहराचा डबलिंग रेट २८ दिवसांचा
शहरात पहिला कोरोनाबाधित एप्रिलच्‍या पहिल्‍या आठवड्यात आढळून आला होता. त्‍यानंतर शहरात बाधितांचा आकडा वाढत गेला. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात सात हजार ५७१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. यापैकी तीन हजार ३३६ नाशिक शहरातील असून, तीन हजार ६३३ नाशिक ग्रामीणचे, तर ४७५ मालेगाव आणि ९७ जिल्‍हाबाह्य कोरोनाबाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. सोमवारी (ता.२८) दिवसभरात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील ६८२, नाशिक ग्रामीणचे ३४२, मालेगावचे २७ तर, जिल्‍हाबाह्य सहा बाधितांचा समावेश आहे.

दिवसभरात एक हजार ५७ बाधित, बरे झाले ५०१ रुग्‍ण 

कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ३४५, नाशिक ग्रामीणचे १२१, मालेगावचे ३१, तर जिल्‍हाबाह्य चार रुग्ण आहेत. दिवसभरात झालेल्‍या २२ मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील दहा, नाशिक ग्रामीणच्‍या बारा रुग्‍णांचा समावेश आहे. दिवसभरात आढळलेल्‍या संशयितांमध्ये नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ९६०, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात १८०, मालेगाव महापालिका रुग्‍णालये १३, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय २०, तर जिल्‍हा रुग्‍णालयात चार संशयित दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ९४६ अहवाल प्रलंबित असून, यात नाशिक शहरातील एक हजार ३९७ अहवालांचा समावेश आहे. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

मालेगाववासीयांना दिलासा 
मालेगाव : शहर व परिसरातील कोरोनाबळी तसेच, कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही कमी होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी दिवसभरात सोयगाव, दौलतनगर भागातील ५२ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा महापालिकेच्या सहारा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. २४ सप्टेंबरला त्यांना येथे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, २८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिवसभरात महापालिका रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्याही अवघी १३ होती. रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ८३.४ टक्के झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील रुग्णालय व गृहविलगीकरणासह उपचार घेणाऱ्यांची संख्या शहरात ४९८, तर तालुक्यात २६६ आहे. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

शहरातील कोरोनाबाधित वाढीचे टप्पे असे- 
(कंसात त्‍या दिवसाची बाधितांची संख्या) 

१ हजार---------------२० जून (१०५६) 
२ हजार---------------२९ जून (२०४०) 
४ हजार---------------१२ जुलै (४०४३) 
५ हजार---------------१७ जुलै (५२४१) 
१० हजार-------------२ ऑगस्‍ट (१०२९६) 
१५ हजार-------------१३ ऑगस्‍ट (१५१४५) 
२० हजार-------------२३ ऑगस्‍ट (२००७४) 
२५ हजार-------------३१ ऑगस्‍ट (२५४५१) 
३० हजार-------------६ सप्‍टेंबर (३००५३) 
३५ हजार-------------१२ सप्‍टेंबर (३५९७४) 
४० हजार-------------१७ सप्‍टेंबर (४०७३५) 
४५ हजार-------------२२ सप्‍टेंबर (४५३१२) 
५० हजार-------------२८ सप्‍टेंबर (५०१८६) 

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com