esakal | शिवजयंतीनिमित्त छत्रपती सेनेने तयार केले 'विश्‍वविक्रमी' टाक! वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

बोलून बातमी शोधा

shivjayanti record.jpg}

शाळकरी मुलींनी टाकवरील पडदा हटविला. टाकची वंडर बुक ऑफ रेकॉर्ड लंडन (विश्‍वविक्रमात) नोंद झाल्याचे सेनेचे कार्याध्यक्ष नीलेश शेलार यांनी सांगितले.

nashik
शिवजयंतीनिमित्त छत्रपती सेनेने तयार केले 'विश्‍वविक्रमी' टाक! वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : शिवजयंतीनिमित्त छत्रपती सेनेतर्फे तयार केलेल्या विश्‍वविक्रमी टाकचे शाळकरी मुलींच्या हस्ते मंगळवारी (ता. १६) सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात अनावरण झाले. शुक्रवारी (ता. १९) शिवजयंती कार्यक्रमात विश्‍वविक्रम झाल्याचे प्रमाणपत्र वितरण होणार आहे. 

छत्रपती सेनेने तयार केलेल्या टाकचे अनावरण 

छत्रपती सेनेतर्फे तयार होणाऱ्या वस्तूंचे विश्‍वक्रम होण्याचे सलग तिसरे वर्ष आहे. २०१९ मध्ये त्यांनी जिरेटोप, तर २०२० शिवजन्मोत्सव सोहळ्यात भवानी तलवार तयार केली. यंदा त्यांनी सहा फूट रुंद आणि आठ फूट उंच विश्‍वविक्रमी टाक तयार केला. गुरुवारी (ता. १८) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांच्या हस्ते अनावरण होणार होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी येण्याची भीती लक्षात घेऊन, दोन दिवस आधीच अनावरण करण्यात आले. शाळकरी मुलींनी टाकवरील पडदा हटविला. टाकची वंडर बुक ऑफ रेकॉर्ड लंडन (विश्‍वविक्रमात) नोंद झाल्याचे सेनेचे कार्याध्यक्ष नीलेश शेलार यांनी सांगितले.

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; शुक्रवारी मिळणार प्रमाणपत्र 

तुषार गवळी, राजेश पवार, संदीप निगळ, डॉ. श्याम थविल. डॉ. जितेश पाटील, किशोर तिडके, जितेंद्र आहेर, धीरज खोळंबे, अविनाश पाटील, डॉ. विशाल गवळी, ॲड. राजेंद्र ठाकरे, गणेश पाटील, वैभव कासार, पंकज येप्रे, परिक्षित येप्रे, डॉ. जयंद्र थविल, सागर जाधव, हृषीकेश गरुड, राज गुंजाळ, श्याम देशमुख, मनीष बोरस्ते, चेतन पाटील, क्षितिज मोरडे, नकुल तिवारी, शुभम येप्रे, ॲड. विद्या चव्हाण, पूजा खरे, धनश्री वाघ, ऋतुजा काकडे, राधिका गवळी, डॉ. सोनाली गवळी, प्रिया कुमावत, निशा शेलार, हेमा शेलार, ललिता शेलार, अशलम लालू ,चेतन राजापूरकर, हृषीकेश कपिले आदी उपस्थित होते. 
हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार
असा झाला टाक 

७० किलोचा टाक आहे. त्यासाठी ६५ किलो पितळ, पाच किलो तांबे व दोन शीट फ्लायवूड (लाख)चा वापर केला आहे. एक महिना टाक तयार करण्यासाठी लागला. तिवंधा लेन येथील बाळकृष्ण संगमनेरकर, लक्ष्मण संगमनेरकर आणि गौरव संगमनेरकर यांनी टाक साकारला. 


अत्याचार, अन्यायाविरुद्ध महाराजांनी उचलेली भवानी तलवारचे प्रतीक म्हणून तलवार, तर १८ पगडबंद आणि १२ बलुतेदारांना घेऊन चालणाऱ्या महाराजांचे प्रतीक म्हणून जिरे टोप तयार केला. यंदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत संकल्पनेतून टाक तयार केला. 
-चेतन शेलार, अध्यक्ष, छत्रपती सेना 
--- 
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले विश्‍वविक्रमी टाक साकरण्याचे भाग्य मला लाभले. याचा गर्व आणि आनंद वाटतो. 
-बाळकृष्ण संगमनेरकर, कारागीर 
..... 
वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणाऱ्या वस्तूंमधील टाक नवीन संकल्पना आहे. शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या टाकचे विश्‍वविक्रमात नोंद झाली आहे. शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमात नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 
-ॲमी चढ्ढा, समन्वयक, वंडर बुक ऑफ रेकॉर्ड