नगर परिषद येईपर्यंत ओझरला ग्रामपालिका निवडणूकच होणार; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Ojhar will have gram panchayat elections till the Municipal Council nashik marathi news
Ojhar will have gram panchayat elections till the Municipal Council nashik marathi news

ओझर (जि.नाशिक) : ओझर ग्रामपलिकेचे नगर परिषदेत रूपांतर होणार, अशी घोषणा ४ डिसेंबरला शासनाने केल्याने पुढील प्रक्रियेला लागणारा वेळ लक्षात घेता तूर्तास ग्रामपलिकेची निवडणूकप्रक्रिया राबवावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. नगरविकास विभागाने नगर परिषद अंमलात येणार असल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट केल्याने तोदेखील मार्ग मोकळा झाला आहे. 

नगर परिषदेची प्रक्रियाही सुरूच राहणार 

राज्यातील १३ ग्रामपालिकांचे नगर पंचायत किंवा परिषदमध्ये रूपांतरित करण्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु निवडणूक आयोगाने यंदाच्या एप्रिल ते डिसेंबर या कालावधीतील १४ हजार २३४ ग्रामपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामुळे ओझरसह राज्यातील इतर गावांतील नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. यामुळे रूपांतरित ग्रामपालिकेच्या निवडणुका न घेता थेट नगर परिषदांच्या घ्याव्यात, अशी याचिका माजी आमदार अनिल कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर मंगळवारी (ता. २२) दुपारी बाराला सुनावणी होऊन कोर्टाने नगरविकास विभागाचे म्हणणे अडीचच्या सुमारास मागवले. त्यात तेरापैकी ओझरची प्रक्रिया आधीच झाल्याने त्या प्रक्रियेला किमान दोन महिने लागतील, तर इतर १२ गावांच्या प्रक्रियेला चार महिने लागतील, असे सांगण्यात आले. परंतु आधीच कार्यकाळ संपल्याने आणि निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असल्याने त्यांचे म्हणणे न्यायाल्याने ऐकून घेतल्यावर शेवटी मुदत संपल्यामुळे तूर्तास जाहीर झालेल्या निवडणुका घ्याव्यात व ज्या वेळी नगर परिषद परिषद म्हणून अंतिम प्रक्रिया राबविली जाईल तेव्हा तो देखील निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, असे सांगितले. 

राज्य शासनाने नगर परिषदेचे राजपत्र काढल्याने ती प्रक्रिया तशी सुरूच राहणार आहे. सध्या ग्रामपालिकेची निवडणूक होत असली तरी नगर परिषद अंमलात येणारच आहे. सदर निवडणुकीवर होणारा दुप्पट खर्च पाहता ती दोन महिने पुढे ढकलावी म्हणून याचिका दाखल केली होती. परंतु आता दोन्ही निवडणुका होतील इतकेच. यात कुणीही गैरसमज पसरवू नये. 
- अनिल कदम, माजी आमदार निफाड 

नगर परिषद झाली तरी त्या निर्णयाचे याआधीच आम्ही स्वागतच केले आहे आणि निवडणूक आयोगाच्या आदेशाने लागलेल्या ग्रामपालिकेच्या प्रक्रियेचेही आम्ही पालन करून लोकशाही पद्धतीने आम्ही सामोरे जाणार आहोत. नगर परिषदेची वार्ताही त्यांनीच आणली अन् ग्रामपालिकेच्या निवडणुकीस हरकत याचिकाही त्यांनीच दाखल केली. आमचा विरोध कधीच नव्हता. 
-यतीन कदम, सदस्य जिल्हा परिषद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com