वावीत सात वर्षीय बलिकेचा विनयभंग करणारा अटकेत; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

अजित देसाई 
Monday, 26 October 2020

योगेश जगन्नाथ नाजगड (29) रा. शहा असे संशयिताचे नाव असून त्याने आज दि.26 दुपारी 3 वाजेच्या सुमारास सदर बलिकेचा विनयभंग करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता.

नाशिक/ सिन्नर : घरात खेळणाऱ्या सात वर्षीय बलिकेचा विनयभंग करणाऱ्या 29 वर्षीय तरुणाविरोधात वावी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

योगेश जगन्नाथ नाजगड (29) रा. शहा असे संशयिताचे नाव असून त्याने आज दि.26 दुपारी 3 वाजेच्या सुमारास सदर बलिकेचा विनयभंग करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. बलिकेने घरी याबाबत सांगितल्यावर नातेवाईकांनी योगेशचा शोध घेऊन त्याला चोप दिला. बलिकेच्या वडिलांनी वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रणजित गलांडे यांनी बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान संशयितास  पोलिसांनी अटक केली असून वैद्यकीय तपासणीनंतर त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे या प्रकरणी तपास करीत आहेत.

हेही वाचा >  पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One arrested for molestation at Wavi nashik marathi news