esakal | पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

arrest.jpg

चोरट्यांनी पत्नीचा खून करून घरातील रोकड आणि दागिने लुटल्याची कहाणी त्याने सांगितली होती. मात्र त्यानेच खून केला असल्याचा संशय असल्याची फिर्याद त्याचे सासरे तानाजी कचरे यांनी पोलिसांत दिली. रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्याने पोलिसांनी पती भरत जाधव (रा.कोकनवाडी, ता.अकोले जि. अहमदनगर) यास अटक केली.

पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार

sakal_logo
By
राजेंद्र बच्छाव

नाशिक : (इंदिरानगर) पाथर्डी फाटा येथे म्हाडा वसाहतीत राहणारी गर्भवती महिला मृतवस्थेत सापडल्याने खळबळ माजली होती. परिसरात चोरट्यांनी चोरी करुन तिला संपविल्याची चर्चा जोर धरु लागली होती. तेवढ्यात महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पतीला अटक केली आहे. वाचा सविस्तर घटना...

असा आहे प्रकार

शनिवारी (ता. 25) पाथर्डी फाटा येथील म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या प्रमिला जाधव (वय 26) या गर्भवती महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासाचे सूत्र फिरवत खुन्याला अवघ्या चोवीस तासात अटक केले. गुन्हेगार दुसरा तिसरा कोणी नसून महिलेचा पतीच होता. चोरट्यांनी पत्नीचा खून करून घरातील रोकड आणि दागिने लुटल्याची कहाणी त्याने सांगितली होती. मात्र त्यानेच खून केला असल्याचा संशय असल्याची फिर्याद त्याचे सासरे तानाजी कचरे यांनी पोलिसांत दिली. रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्याने पोलिसांनी पती भरत जाधव (रा.कोकनवाडी, ता.अकोले जि. अहमदनगर) यास अटक केली. पोलीस चौकशीत देखील त्यानेच बनाव केल्याचे स्पष्ट होत असले तरी अद्याप त्याने खुनाची कबुली दिलेली नाही. 

असा होता बनाव

म्हाडा घरकुल प्रकल्पाच्या सी मधील विंग मधील दहाव्या मजल्यावरील 1002 क्रमांकाच्या सदनिकेत प्रमीला व भरत वर्षांपासून भाडे तत्वावर पत्नी सोबत वास्तवास होते. भरत सकाळी सातपूर येथील एल जी कंपनीच्या शो रूम या त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी कामाला गेला. दुपारी जेवणाच्या सुट्टीत पत्नीला मोबाईलवर संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र काही प्रतिसाद लाभला नाही. त्यात पत्नी प्रमीला गरोदर असल्याने चिंता वाढल्याने तो अर्ध्या तासात घरी पोचला. दरवाज्याला बाहेरून कडी लावलेली आढळली. कडी उघडली असता समोर एका ब्लॅंकेटमध्ये तोंड आणि पाय बांधलेल्या आणि पूर्ण शरीराला वायरने बांधून ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेली प्रमीला मृतावस्थेत पडलेली दिसून आली. चोरट्यांनी तिला ठार मारत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने मोबाईल व घरात ठेवलेले दहा ते पंधरा हजाराची रोकड असा ऐवज घेऊन दरवाजाला कडी लावून पोबारा केल्याचा बनाव करत भरतने सर्वांना कळवले.

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

पतीनेच खून केल्याचा संशय

प्रमिलाचा मृत्यूचा सांगितलेला कालावधी आणि भारत सांगत असलेल्या घटनाक्रमातील कालावधीशी सुसंगत होत नव्हता. चोरट्यांनी घरातील इतर सामानला हात न लावल्याने  सामान अस्ताव्यस्त झालेले नाही. यामुळे सगळेच संशयास्पद वाटत होते. फिर्यादीनुसार उपरोक्त बाबींसह महिलेच्या अंगावर असलेल्या दागिनेची किंमत एवढी नसून तुटपुंजा पगार बघता घरात रोख रक्कम घरात असणे अशक्य आहे. त्यामुळे काहीतरी कारणावरून पतीनेच खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर करीत आहेत.

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;


 

go to top