गुजरातमधून निघालेला कंटेनर नाशिकमध्ये अडविला; कारवाईत पोलीसांतर्फे कोटीचे "घबाड" हस्तगत

chandori contener crime.jpg
chandori contener crime.jpg

चांदोरी (जि.नाशिक) : गुजरातमधून निघालेला उत्तर प्रदेश पासिंगचा एक कंटेनर नाशिकहून औरंगाबादला जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलीस पथकाने नाशिक ते औरंगाबाद रोडवर सापळा रचला. मध्यरात्री दीडला चितेगाव फाट्यानजीक गतिरोधकाजवळ वाहनाचा वेग कमी झाल्यानंतर वाहन थांबविण्यासाठी इशारा देत वाहन बाजूला घेतले. त्यावेळी त्या ट्रकमधून पोलीसांच्या हाती एक कोटीचे घबाड लागले

चितेगाव फाट्यावर ग्रामीण पोलिसांची कामगिरी 
पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री उशिरा ही कारवाई केली. त्यात, गुजरातमधून निघालेला उत्तर प्रदेश पासिंगचा एक कंटेनर नाशिकहून औरंगाबादला जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दिवे, कुणाल वैष्णव, सांगळे, पोलिस उपनिरीक्षक तांबे यांच्या पथकाने नाशिक ते औरंगाबाद रोडवर सापळा रचून मध्यरात्री दीडला चितेगाव फाट्यानजीक गतिरोधकाजवळ वाहनाचा वेग कमी झाल्यानंतर वाहन थांबविण्यासाठी इशारा देत वाहन बाजूला घेतले. सहाय्यक पोलिस निरीक्षक दिवे यांच्या चौकशीत चालकांकडून उलटसुलट उत्तरे पुढे आल्याने पोलिसांनी कंटेनर 
ताब्यात घेत चौकशी केली. 

सुमारे एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत

नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाने चितेगाव फाट्यावर रविवारी (ता. ४) गुजरातमधून येणारा एक कोटी सहा लाखांचा मसाला, गुटख्याचा कंटेनर पकडला. कंटेनरचालक समशूल दिलशाद इस्माल (वय २९, रा. इब्राहिमपूर, बिल्लोरी, जि. मुराराबाद, उत्तर प्रदेश) तसेच क्लीनर जगदीश सिंग यादव (रा. नगलानपूर, मुराराबाद, उत्तर प्रदेश) यांना ताब्‍यात घेत, पोलिसी खाक्या दाखविताच पानमसाला व सुगंधित तंबाखू असल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी कंटेनरमधील ९६ लाखांच्या ३६० गोण्या गुटखा, सुगंधी तंबाखू हस्तगत करीत कंटेनर जप्त करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com