esakal | दोन परिवारांत दिवाळीच्या दिवशी कौटुंबिक वाद; एकाचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

death body.jpg

दिवाळीत कौटुंबिक वादातून झालेल्या हाणामारीत समलदेव रामसिंगार यादव गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

दोन परिवारांत दिवाळीच्या दिवशी कौटुंबिक वाद; एकाचा मृत्यू 

sakal_logo
By
सतीश निकुंभ

सातपूर (नाशिक) : दिवाळीत कौटुंबिक वादातून झालेल्या हाणामारीत समलदेव रामसिंगार यादव गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सातपूरच्या विश्‍वासनगर भागात हा प्रकार उघडकीस आला.

कौटुंबिक वादातून दिवाळीला एकाचा मृत्यू 

औद्योगिक क्षेत्राला लागून असलेल्या विश्‍वासनगर वस्तीत समलदेव रामसिंगार यादव व सुकत चव्हाण या दोन परिवारांत दिवाळीच्या दिवशी कौटुंबिक वादातून हाणामारी झाली. त्यात समलदेव यादव याला सुकत चव्हाण व त्याची दोन मुले संदीप व संजय चव्हाण यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले. जखमी समलदेवचा अशोकनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाच दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. सातपूर पोलिस ठाण्‍यात गुन्हा दाखल झाला आहे.

 हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान