
मित्राकडून भावाच्या लग्नाचे आमंत्रण आले होते. जवळचा मित्र असल्याने अक्षय हळदीच्या कार्यक्रमाला निघाला. सुखाचा प्रवास सुरु असतांनाच नियतीने अडविला रस्ता अन् काही वेळात आनंदावर विरजण. असे काही घडले की कुटुंबियांसह मित्रालाही अश्रू अनावर. वाचा नेमके काय घडले?
देवळा (नाशिक) : मित्राकडून भावाच्या लग्नाचे आमंत्रण आले होते. मित्राचा भाऊ कसा तोदेखील मित्रच झाला होता. जवळचा मित्र असल्याने अक्षय हळदीच्या कार्यक्रमाला निघाला. सुखाचा प्रवास सुरु असतांनाच नियतीने अडविला रस्ता अन् काही वेळात आनंदावर विरजण. असे काही घडले की कुटुंबियांसह मित्रालाही अश्रू अनावर. वाचा नेमके काय घडले?
अशी आहे घटना
देवळा-नाशिक रस्त्याच्या भावडबारी घाटाच्या पायथ्याशी भावडे फाट्याजवळील घटना. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, बुधवार (ता.6) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अक्षय गणपत दिवे (वय 26, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) हा तरुण नाशिकवरुन सटाणा येथे मित्राच्या भावाच्या हळदीच्या कार्यक्रमाला जात होता. तो स्वतःच ड्रायव्हिंग करत होता. भावडबारी घाटाच्या पायथ्याशी सदर स्कोडा चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली. यात अक्षय हा तरुण कारखाली दबला गेल्याने तो जागीच ठार झाला. देवळा पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
हेही वाचा > मैत्रीत मोठा घात! मित्राच्याच डोक्यात घातला मोठा दगड; नशेत सांगितली धक्कादायक आपबिती
मोटार अपघाताचा गुन्हा दाखल
देवळा पोलिसांत मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तापास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर, खंडेराव भवर, विनायक गायकवाड, लहानू धोकरट करीत आहेत.
हेही वाचा > डोळ्यासमोर काळ अन् गळ्याभोवती बांधलेल्या स्टोलमुळे वाचली तरुणी; अंगावर काटा आणणारी घटना