धक्कादायक! स्वत:च्याच मुलांसोबत केला अमानुष प्रकार; आजीच्या तक्रारीवरुन पोलिस पित्याला अटक

पोपट गंवादे
Sunday, 17 January 2021

रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलिसाने आपल्या दोन लहान मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी मुलांच्या आजीने तक्रार दिल्यावरून इगतपुरी पोलीस ठाण्यात शनिवार (ता. 16) रात्री गुन्हा दाखल झाला असून संशयित लोहमार्ग पोलिसाला अटक करण्यात आली आहे.

इगतपुरी (नाशिक) : रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलिसाने आपल्या दोन लहान मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी मुलांच्या आजीने तक्रार केली आहे. इगतपुरी पोलीस ठाण्यात शनिवार (ता. 16) रात्री गुन्हा दाखल झाला असून संशयित लोहमार्ग पोलिसाला अटक करण्यात आली आहे.

असा आहे प्रकार

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी राहुल मोरे याच्या पहिल्या पत्नीला 7 वर्षाचा मुलगा (साहील) व 5 वर्षाची मुलगी (प्रिया) आहे. 2016 ला या मुलांच्या आईचा एका दुर्धर आजारात मृत्यु झाला. त्यानंतर राहुल मोरे याने 2017 ला दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीला 3 वर्षाची मुलगी आहे. दुसरी पत्नी व स्वत: वडील या दोन लहान मुलांना अमानुषपणे रोज लोखंडी पट्टीने व बेल्टने मारहाण करतात. याबाबत शेजाऱ्यांनी सुरत येथे राहणाऱ्या मुलांच्या आजीला भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. आजी यांनी स्वत: येऊन पाहणी केली असता मुलांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे निदर्शनात आले. त्यांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल केली.

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

संशयित राहुल मोरे या रेल्वे पोलिसाला अटक केली असुन या घटनेचा अधिक तपास पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस दिपक पाटील, उपनिरीक्षक शरद सोनवणे, पोलीस हवालदार विनोद गोसावी, गणेश वराडे, सचिन देसले, वैभव वाणी आदी करीत आहे.

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one railway police arrested for beating his own children nashik marathi news