
नाशिक : नदी किनाऱ्यापासून शंभर मीटरपर्यंत कुठल्याही प्रकारचे बांधकाम करण्यास परवानगी नसतानाही स्मार्टसिटी अभियानातील हरितक्षेत्र विकासांतर्गत मखमलाबाद व हनुमानवाडी येथे ७५४ एकर क्षेत्रावर नगरपरियोजना राबविताना नदीकाठच्या जमिनींचा समावेश करण्यात आला. यास उपमहापौर भिकूबाई बागूल यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती संजय बागूल यांनी हरकत घेत ते सर्व्हे क्रमांक वगळण्याची मागणी केली.
स्मार्टसिटी अभियानातील हरितक्षेत्र विकासांतर्गत पंचवटी विभागातील मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरात ७५४ एकर क्षेत्रात नगरपरियोजना राबविली जाणार आहे. नगरपरियोजना राबवू नये, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे असून, वेळोवेळी विरोधही करण्यात आला आहे. एकीकडे शेतकऱ्यांचा विरोध असला तरी दुसरीकडे प्रशासनाकडून कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात आहे. २४ ऑगस्टला नगरचना संचालनालयाने आराखड्याला मंजुरी दिली. त्यानंतर आता अंतिम उद्देश घोषणा प्रसिद्ध केली जाणार आहे. महासभा प्राधिकरण असल्याने त्यासाठी मान्यता आवश्यक आहे. संचालनालयाकडून आराखडा मंजूर करताना अभिप्राय नोंदविला आहे. त्यात नगररचना संचालकांनी स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करावी, त्यांचे मत जाणून घेतल्याशिवाय प्रक्रिया राबवू नये, असा स्पष्ट अभिप्राय दिला असताना महासभा बोलावून अंतिम उद्देश जाहीर करण्यास परवानगी देण्यात आली. ७५४ एकर क्षेत्रातील नगरपरियोजनेत ५६ एकर क्षेत्रातील डीपी रस्ते नाले जलसंपदा विभागाचे आहेत. मोरे मळा वस्तीतील वगळलेले क्षेत्र सतरा एकरचे असून, ११६ एकर क्षेत्र न्यायप्रविष्ट आहे. ३७० एकर क्षेत्रावरील शेतजमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे योजना रद्द करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी असताना आता पूररेषेतील जमिनींचा समावेश करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
स्मार्टसिटी कंपनीच्या भूमिकेबद्दल संशय
नगरपरियोजनेत गोदावरी किनाऱ्याचा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने निळी व लाल रेषा आखून या भागात बांधकाम करण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे स्मार्टसिटी कंपनीने नगरपरियोजनेचा आराखडा तयार करताना पूररेषेतील जमिनीचा समावेश केल्याने स्मार्टसिटी कंपनीच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त करताना या जागा वगळण्याची मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.