esakal | ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा
sakal

बोलून बातमी शोधा

Two friends drowned while swimming.png

प्रसाद हा खंडेराव सूर्यवंशी यांचा एकुलता मुलगा असून, दुसरा मित्र राहुलला एक भाऊ आहे. एकुलत्या मुलाचे व कर्त्या तरुणांच्या त्या बातमीने सूर्यवंशी व सागर कुटुंबीयांवर आभाळच कोसळले आहे. काय घडले...

ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : प्रसाद हा खंडेराव सूर्यवंशी यांचा एकुलता मुलगा असून, दुसरा मित्र राहुलला एक भाऊ आहे. एकुलत्या मुलाचे व कर्त्या तरुणांच्या त्या बातमीने सूर्यवंशी व सागर कुटुंबीयांवर आभाळच कोसळले आहे. काय घडले...

दुपारी दोघांची भेट अखेरचीच

मुंगसे-टाकळी व वाके या गावांच्या सीमेलगत कुरण तलाव आहे. विक्रमी पावसामुळे तलाव पूर्णपणे भरला होता. काही अंतरावर त्यांची शेती आहे. आज दुपारी दोघांची भेट झाल्यानंतर ते फिरत फिरत तलावात पोहण्यासाठी गेले. सफाईदारपणे पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने एकजण बुडू लागला. त्याला वाचवताना दुसऱ्याचाही मृत्यू झाला. तेथील ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तलावाकडे धाव घेतली. तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास 

दोघा तरुणांवर रात्री अंत्यसंस्कार
प्रसाद हा खंडेराव सूर्यवंशी यांचा एकुलता मुलगा असून, राहुलला एक भाऊ आहे. एकुलत्या मुलाचे व कर्त्या तरुणांच्या निधनामुळे सूर्यवंशी व सागर कुटुंबीयांवर आभाळच कोसळले आहे. सुमारे अर्धा तासानंतर दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढून सामान्य रुग्णालयात शवचिकित्सेसाठी आणण्यात आले. याबाबत माहिती मिळताच कृषिमंत्री दादा भुसे यांनी सामान्य रुग्णालयात जाऊन तरुणांच्या आप्तेष्टांची विचारपूस केली. शवचिकित्सेनंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून मुंगसे येथे नेण्यात आले. दोघा तरुणांवर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला

मुंगसे गावावर शोककळा

मुंगसे-टाकळी (ता. मालेगाव) शिवारातील कुरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा जीवलग मित्रांचा तलावात बुडून मृत्यू झाला. रविवारी (ता. १) दुपारी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. राहुल राजेंद्र सागर (वय १९) व प्रसाद खंडेराव सूर्यवंशी (वय १९, दोघे रा. मुंगसे) अशी या दोन्ही मित्रांची नावे आहेत. या दुर्घटनेमुळे मुंगसे गावावर शोककळा पसरली आहे.

go to top